WhatsApp Down वर मुंबई पोलिसांचं मजेशीर ट्वीट; कोपरखळी देत नागरिकांना 'हा' सल्ला!

भारतामध्ये Whatsapp Down वर मुंबई पोलिसांनी दिली काही अशी प्रतिक्रिया

WhatsApp Down | Pixabay and Twitter/ Mumbai Police

जगभर प्रसिद्ध असलेल्या लोकप्रिय मेसेजिंग अ‍ॅप व्हॉट्सअ‍ॅपच्या (WhatsApp) सर्व्हिसमध्ये शुक्रवार (19 जून) रात्री पासून बिघाड आहे. भारतामध्ये अनेक युजर्सनी त्यांना काल रात्री पासून प्रायव्हसी सेटिंगमध्ये काही समस्या येत असल्याचं म्हटलं आहे. दरम्यान अनेकांना 'लास्ट सीन', ' टायपिंग' दिसत नाही. तर अनेकांना स्टेट्स दिसत नसल्याची तक्रार त्यांनी केली आहे. दरम्यान यावर मुंबई पोलिसांनीही 'What’s up Mumbai? No ‘last seen at’ hassles here! If you are ‘typing’ a concern you will find us 'online' and ‘replying’ to you 24/7' असं ट्वीट केलं आहे. म्हणजे मुंबई कर कसे आहात? इथे लास्ट सिनचा प्रश्न नाही. तुम्ही समस्या 'टाईपिंग' कराल तेव्हा आम्ही 'ऑनलाईन' असू आणि 24 तास'रिप्लाय' देण्यासाठी सज्ज आहोत. असा विश्वास त्यांनी मुंबईकरांना दिला आहे. WhatsApp Down in India: भारतात व्हॉट्सअॅप डाऊन झाल्याने सोशल मिडियावर मजेशीर Memes चा पाऊस.

दरम्यान मुंबई शहरात कोरोना व्हायरसच्या दहशतीमुळे नागरिकांना अनावश्यक गर्दी टाळण्याचं तसेच घरी रहा सुरक्षित रहा असा सल्ला देण्यात आला आहे. मुंबईकरांना या काळात तक्रार दाखल करण्यासाठी देखील ऑनलाईन यंत्रणा खुली करण्यात आली आहे. त्यामुळे तक्रार करण्यासाठीदेखील नागरिकांना बाहेर पडावं लागत नाही. अनेकांच्या तक्रारीची दखल मुंबई पोलिसांच्या ट्वीटर अकाऊंटवर घेऊन संबंधित पोलिस स्टेशनला देखील कळवण्यात येत आहे.

Mumbai Police Tweet

काल पासून व्हॉट्सअ‍ॅपची विस्कळीत सेवा अजूनही खंडीत आहे. WABetaInfo वरून याबाबत माहिती देण्यात आली आहे. प्रायवसी सेटिंग अपडेटच्या दरम्यान काही तांत्रिक बिघाडानंतर हा घोळ झाला आहे काल त्यानंतर #whatsappdown हा हॅशटॅग देखील ट्रेंड झाला होता तर अनेक नेटकर्‍यांनी यानंतर मजेशीर मिम्स शेअर केले आहेत.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif