Fact Check: MSME मंत्रालय लोन देण्यासाठी 1000 रुपये प्रोसेसिंग फी आकारात आहे? PIB ने उलघडले सत्य

यात अजून एका नव्या बातमीची भर पडली आहे. एमएसएमई मंत्रालयाकडून लोन देण्यात येत आहे, यासाठी 1000 रुपये प्रोसेसिंग फी असल्याचे सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या पोस्ट मध्ये म्हटले आहे.

Fake News on MSME Ministry Granting Loan (Photo Credits: PIB)

कोरोना व्हायरस (Coronavirus) संकट काळात फेक न्यूजचे (Fake News) वाढलेले प्रस्थ अद्याप कमी झालेले नाही. यात अजून एका नव्या बातमीची भर पडली आहे. एमएसएमई मंत्रालयाकडून (MSME Ministry) लोन देण्यात येत आहे, यासाठी 1000 रुपये प्रोसेसिंग फी (Processing Fee) असल्याचे सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या पोस्ट मध्ये म्हटले आहे. पोस्टमध्ये असा दावा केला आहे की, "एमएसएमई मंत्रालयाने जारी केलेल्या पत्रानुसार मंत्रालय कर्ज उपलब्ध करुन देत आहे आणि यासाठी प्रक्रिया शुल्क 1000 रुपये देण्याची विनंती करण्यात आली आहे."

एमएसएमई मंत्रालय पंतप्रधान रोजगार हमी योजनेंतर्गत कर्ज उपलब्ध करुन देत असल्याचा दावा या बनावट पत्रात करण्यात आला आहे. या खोट्या दाव्याचे खंडन करताना पीआयबी प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोने सांगितले की, "हे पत्र बनावट आहे आणि एमएसएमई मंत्रालय आपल्या कोणत्याही क्रेडिट योजनेसाठी वैयक्तिक लाभार्थ्यांशी थेट व्यवहार करत नाही."

Fact Check By PIB:

कोरोनो व्हायरसचे संकट ओढावल्यानंतर सोशल मीडियावर अशा अनेक बनावट बातम्या जंगलातील आगीप्रमाणे पसरत आहेत. अशा सर्व बातम्यांवर आणि सोशल मीडिया पोस्टवर विश्वास ठेवू नये, अशी विनंती सरकारकडून सातत्याने करण्यात येत आहे. डिजिटल व्यासपीठावरील बनावट आणि दिशाभूल करणार्‍या बातम्यांना आळा घालण्यासाठी सरकारने तथ्या तपासणीसारखे अनेक उपक्रम घेतले आहेत. (Fact Check: येत्या 30 नोव्हेंबर पर्यंत बंद राहणार शाळा? PIB ने केला व्हायरल बातमीचा खुलासा)

दरम्यान, सोशल मीडियावर पसरणाऱ्या बातम्यांवर आंधळेपणाने विश्वास ठेऊ नका. त्यामुळे गोंधळ निर्माण होऊन दिशाभूल होऊ शकते. तसंच काही वेळेस फसवणुक होण्याचीही शक्यता असते.