Jewelry Bag Snatched By Monkey: वृंदावनमध्ये माकडाने पळवली 20 लाख रुपयांच्या दागिन्यांची बॅग; पोलिसांनी कशी केली कारवाई? जाणून घ्या
कोतवाली प्रभारी प्रशांत कपिल यांनी सांगितले की, अभिषेक अग्रवाल गुरुवारी ठाकूरजींची फूल-बांगला सेवा करण्यासाठी त्याच्या कुटुंबासह आले होते. मंदिर दर्शनाच्या वेळी अभिषेकच्या पत्नीने तिचे दागिने काढून बॅगेत ठेवले होते.
Jewelry Bag Snatched By Monkey: वृंदावन (Vrindavan) मध्ये एका माकडाने दिवसाढवळ्या असं काही केलं आहे, ज्याची चर्चा सध्या देशभरात सुरू आहे. या माकडाचा कारनामा असा होता की, पोलिसांनी माकडाच्या मागावर एक पोलिस पथक तैनात करावे लागले. खरंतर, अलीगडमधील दागिने व्यावसायिक अभिषेक अग्रवाल हे ठाकूर बांके बिहारी यांच्या मंदिरात फूल-बांगला सेवा करण्यासाठी आले होते. त्यानंतर एका माकडाने (Monkey) त्याच्या हातातून हिऱ्यांच्या दागिन्यांनी भरलेली बॅग हिसकावून (Jewelry Bag) पळ काढला. या बॅगमध्ये सुमारे 20 लाख रुपयांपेक्षा जास्त किंमतीचे हिऱ्यांचे दागिने होते.
काय आहे नेमकं प्रकरण?
कोतवाली प्रभारी प्रशांत कपिल यांनी सांगितले की, अभिषेक अग्रवाल गुरुवारी ठाकूरजींची फूल-बांगला सेवा करण्यासाठी त्याच्या कुटुंबासह आले होते. मंदिर दर्शनाच्या वेळी अभिषेकच्या पत्नीने तिचे दागिने काढून बॅगेत ठेवले होते. दुसऱ्या दिवशी ते परत येत असताना पार्किंगमध्ये असताना अचानक एका माकडाने त्याच्या हातातून बॅग हिसकावून घेतली आणि तेथून पळ काढला. या बॅगेत 20 लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीचे हिऱ्यांचे दागिने होते. या घटनेमुळे अभिषेक आणि त्याच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला. (हेही वाचा - Viral Video: तोंडावर मेकपचा थर, विमानतळावरचं मशीन हबकलं, ओळखच दाखवेना; महिलेची पंचाईत, कसा सुटला गुंता? तुम्हीच पहा)
CCTV फुटेवरून काढला माकडाचा माग -
सर्कल ऑफिसर (सदर) संदीप कुमार सिंह यांनी सांगितले की, बांके बिहारी पोलिस चौकीचे प्रभारी प्रशांत कपिल यांनी तात्काळ कारवाई केली. पोलिसांनी घटनास्थळाभोवती बसवलेले सीसीटीव्ही फुटेज पाहिले आणि जवळच्या लोकांची चौकशी केली. पोलिस पथकाने माकडाला वेढा घातला आणि तासन्तास कठोर परिश्रमानंतर बॅग एका झुडपात सुरक्षित आढळली. नंतर बॅग त्याच्या मालकाला परत करण्यात आली. (हेही वाचा - RCB Fans Divorce Poster: 'RCB जिंकला नाही तर पतीला घटस्फोट देईल...'; सोशल मीडियावर महिला चाहत्याचे घटस्फोटाचे पोस्टर व्हायरल)
व्यावसायिकाने देवाचे आणि पोलिसांचे आभार मानले. बॅग परत मिळाल्यानंतर अभिषेक अग्रवाल म्हणाले की, 'हे सर्व केवळ ठाकूर बांके बिहारी यांच्या कृपेमुळे आणि वृंदावन पोलिसांच्या कठोर परिश्रमामुळे शक्य झाले. मी मनापासून त्यांचे आभार मानतो.'
(The above story first appeared on LatestLY on Jun 08, 2025 12:58 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

