Monkey Ride On Cat's Back Video: मांजराच्या पाठीवर माकड स्वार, निसर्गाच्या दुनीयेतील अनोखी सफर; पाहा व्हायरल व्हिडिओ
माकडाच्या पिलाने मांजराच्या पाठीवर बसून केलेली सफर सध्या सोशल मीडियावर कौतुकाचा विषय ठरला आहे. आपणही हा मजेशी व्हिडिओ येथे पाहू शकता.
एकमेकांप्रती प्रेम, जिव्हाळा, आपूलकी दाखवणे हे मानवाला बुद्धी आणि भाषेच्या जोरावर शक्य असते. प्राण्यांचे तसे नसते. पण तरीदेखील प्राणी आपापल्या परीने एकमेकांना समजून घेत एकमेरांप्रती जिव्हाळा दाखवतात. जे पाहून मानवाल त्यांची कृती आपल्या कॅमेऱ्यात कैद करण्याचा मोह आवरता येत नाही. सोशल मीडियावर व्हायरल (Viral Videos) झालेल्या मांजर आणि माकडाच्या पिलाचा व्हिडिओ (Monkey Ride On Cat's Back Video) हेच तर दर्शवतो. माकडाच्या पिलाने मांजराच्या पाठीवर बसून केलेली सफर सध्या सोशल मीडियावर कौतुकाचा विषय ठरला आहे. आपणही हा मजेशी व्हिडिओ येथे पाहू शकता.
व्हिडिओमध्ये एक मांजर आपला मित्र गिलहरी माकड (Squirrel Monkey) सोबत रस्त्यावर फिरताना आणि आनंददायी वेळ घालवताना दिसते. व्हिडिओमध्ये माकडाने मांजरीच्या पाठीवर घट्ट पकडलेले आहे. दोघे रस्त्यावर फिरताना दिसत आहेत. Buitengebieden नावाच्या ट्विटर अकाऊंटद्वारे शेअर केल्या गेलेल्या या व्हिडिओचे नेटीझन्सकडून जोरदार कौतुक होत आहे. (हेही वाचा, Little Girl Viral Video: मांजर रंगलंय चित्र काढण्यात, लहान मुलगी झाली शिक्षिका; व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल)
मांजर आणि माकड यांच्यातील गोंडस मैत्रीने लोकांची मने जिंकली आहेत. हा व्हिडिओ 14 नोव्हेंबर रोजी शेअर केल्यापासून आतापर्यंत ( हे वृत्त लिहीपर्यंत) सुमारे 1 दशलक्षाहून अधिक लोकांनी पाहिला आहे. त्याला 6700 हून अधिक रीट्विट्स मिळाले आहेत. युजर्सनी पोस्टच्या कमेंट सेक्शनमध्ये त्यांच्या मनापासून प्रतिक्रिया दिल्या आहेत.
व्हिडिओ
एका ट्विटर युजरने लिहिले आहे की, सर्वोत्तम मित्र हेच करतात. ते एकमेकांना सोबत घेऊन जातात दुसरा युजर्स म्हणतो, मांजर खरोखर अत्यंत सावध आणि बचावात्मक आहे, जसे की ती स्वतःच्या पाठिचे संरक्षण करण्याचा प्रयत्न करत आहे.तिसरा म्हणतो मंजराने खरोखरच ल माकड दत्तक घेतले आहे.