Miracle Cure for COVID-19: Amazon वर शरीराचं निर्जंतुकीकरण करणारं कोरोनावरील चमत्कारी औषध म्हणुन विकलं जातंय ब्लीच? वाचा सविस्तर
Amazon वर एक ब्लीच (Industrial Bleach) विकलं जात आहे. ज्यामुळे शरीराचं निर्जंतुकीकरण होईल आणि कोरोनाला शरीरात प्रवेशच करता येणार नाही असा दावा वापरकर्ते करत आहे,
कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) विळख्यात आता अर्ध्याहुन अधिक जग अडकले आहे, अशावेळी प्रत्येक जण कोरोनावरील लसीच्या (COVID 19 Vaccine) शोधात आहे. मात्र काही मंंडळींंनी लसीची वाट न पाहता आपलेच भलते सलते उपचार सुरु केले आहेत. यातीलच एक विचित्र किंंबहुना जादुई उपाय सध्या चर्चेत आहे. प्राप्त माहितीनुसार, Amazon वर एक ब्लीच (Industrial Bleach) विकलं जात आहे. ज्यामुळे शरीराचं निर्जंतुकीकरण होईल आणि कोरोनाला शरीरात प्रवेशच करता येणार नाही असा दावा वापरकर्ते करत आहे, हा चमत्कारिक मार्ग असल्याचं सुद्धा अनेकजण म्हणत आहेत. मात्र हा पर्याय शरीरासाठी अपायकारक असल्याचे तज्ञांंकडुन सांंगितले जातेय. US Food and Drug Administration च्या माहितीनुसार, या पेयाने शरीरात विषबाधा होऊन प्राण गमावण्याची सुद्धा शक्यता असते. Glasses Protect Against COVID-19: चष्मा घालणाऱ्या व्यक्तींना कोरोना संसर्गाचा धोका कमी? जाणून घ्या तज्ञांचे मत
द गार्डियनच्या वृत्तानुसार, शरीराचं निर्जंतुकीकरण करणारे हे औषध म्हणजे क्लोरीन डायऑक्साईड चं सोल्युशन आहे. जे की CD किट आणि Natrichor च्या स्वरुपात विकले जातेय, या सोल्युशनच्या पॅकेजिंंग वर तरी हे औषध पिण्यासाठी नाही असे स्पष्ट सांंगितले आहे. मात्र या उत्पादनाच्या खाली रिव्ह्यु बॉक्स मध्ये अनेकांंनी हे सोल्युशन आपण पित असल्याचे म्हंंटले आहे. इतकेच नव्हे तर किती प्रमाणात घ्यावे आणि त्यामुळे कसे जंंतु मरुन जातात हे सांंगितलेले आहे. अनेकांंनी याला जादूई सोल्युशन म्हणत आपल्याला यामुळे बरे वाटत असल्याचे सुद्धा रिव्ह्यु मध्ये नमुद केले आहे.
दरम्यान, हे क्लोरिन डायऑक्साईड औद्योगिक क्षेत्रात वापरले जाते त्याचा वापर कागद आणि कपडा ब्लीच करण्यासाठी केला जातो. याचा वापर पाणी निर्जंतुक करण्यासाठी केला जातो असे ही म्हंंटले जाते मात्र जे प्रमाण रिव्ह्यु बॉक्स मध्ये युजर्सने नमुद केलेय ते जीवाला धोका पोहचवु शकते. अनेकांंनी तर हे सोल्युशन मलेरिया, HIV आणि कॅन्सर चा उपाय करेल असेही सांंगितले आहे. मात्र हे दावे फोल आहेत, कोणीही याचा वापर पिण्यासाठी करु नका आणि लहान मुलांंना तर चुकुनही त्याजवळ जाऊ देऊ नका असे आवाहन FDA कडुन करण्यात आले आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)