अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यूनंतर सोशल मीडियावर ट्रेंड
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यूबद्दल दु:ख व्यक्त केले. त्यासोबतच चित्रपटसृष्टी, क्रीडाविश्व आणि सोशल मीडियातूनही त्याच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त करण्यात आले.
अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) याच्या मृत्यूनंतर तो सोशल मीडिया खास करुन Twitter वर ट्रेंड झाला. सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यूनंतर सोशल मीडियावर चाललेल्या ट्रेंडमध्ये प्रामुख्यने हॅशटॅग अनबिलिवल, मैंटल हेल्थ मॅटर्स (Mental Health Matters), एमएस धोनी, डिप्रेशन (Depression), छिछोरे (Chhichhore), सुसाइड अवेयरनेस (Suicide Awareness), इंडियन मीडिया, गोन टू सून, शॉकिंग हे ट्रेण्ड्स दिसत होते. वेगवेगळे हॅशटॅग वापरुन युजर्सनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
अभिनेता सुशांत सिंह राजपूत हा गेले काही काळ नैराश्येत होता. त्यातूनच त्याने मुंबई येथील वांद्रे परिसरातील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे वृत्त आहे. त्याचा शवविच्छेदन अहवाल अद्याप प्राप्त होऊ शकला नाही. त्यामुळे त्याने आत्महत्या केली की त्याच्या मृत्यूमागे आणखी काही कारण आहे याबाबत अद्याप स्पष्टता नाही.
दरम्यान, सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यूनंतर विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी दु:ख व्यक्त केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यूबद्दल दु:ख व्यक्त केले. त्यासोबतच चित्रपटसृष्टी, क्रीडाविश्व आणि सोशल मीडियातूनही त्याच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त करण्यात आले.