Kerala Shocking: केरळमध्ये 6 वर्षीय मुलीसोबत बसमध्ये प्रवास करणाऱ्या महिलेला पुरुषाने दाखवला प्रायव्हेट पार्ट; आरोपीविरोधात गुन्हा दाखल (Watch Video)

घटनेच्या वेळी महिला तिच्या सहा वर्षांच्या मुलीसह कन्हानगडला जात होती. यावेळी बसमध्ये फारसे प्रवासी नव्हते.

Man shows private part to woman (PC - You Tube)

Kerala Shocking: केरळ (Kerala) च्या बेकलमध्ये सोमवारी एका व्यक्तीने बसमधून प्रवास करणाऱ्या महिलेसमोर गुप्तांग (Private Parts) दाखवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. वृत्तानुसार, महिलेने तिच्या फोनमध्ये या घटनेचा व्हिडिओ रेकॉर्ड केला. ही घटना कन्हनगड ते बेकल दरम्यान घडली. घटनेच्या वेळी महिला तिच्या सहा वर्षांच्या मुलीसह कन्हानगडला जात होती. यावेळी बसमध्ये फारसे प्रवासी नव्हते.

व्हिडिओमध्ये दिसत आहे की, हा तरुण महिला आणि तिच्या मुलीच्या बाजूच्या सीटवर बसला होता. महिलेने कंडक्टरला या व्यक्तीबद्दल माहिती देण्याचा प्रयत्न केला तोपर्यंत तो बसमधून उतरला आणि पळून गेला. (हेही वाचा -Shocking! अन्नपदार्थ सर्व्ह करण्याआधी त्यावर आपले Private Parts घासले, जेवणामध्ये केली लघवी; रेस्टॉरंटमधील वेटरचे घृणास्पद कृत्य)

पहा व्हिडिओ -

दरम्यान, महिलेने या घटनेची पोलिसात तक्रार केल्यानंतर आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पोलिस व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या व्यक्तीचा शोध घेत आहेत. यापूर्वी देखील अशा स्वरुपाच्या घटना समोर आल्या असून अशा घटनांमधील आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif