लग्नसोहळ्यादरम्यान नव वधू-वरावर नोटा उडवत असताना पडला व्यक्ती, पुढे काय झाले तुम्हीच पहा (Watch Viral Video)
Viral Video (Photo Credits-Instagram)

Viral Video: भारतीय लग्नसोहळा हा विविध परंपरा आणि धर्मानुसार पार पाडले जातात. लग्नात नव वधू-वरासह त्यांच्या मित्रपरिवाराकडून धम्माल मजा केली जाते. याच संदर्भातील काही मजेशीर व्हिडिओ सुद्धा सोशल मीडियात व्हायरल होतात. अशातच लग्नाच्या स्टेजवर नव वधू-वरावर एक व्यक्ती पैसे उडवत होता. परंतु त्यानंतर असे काही झाले ते पाहून सर्वांना हसू आवरेनासे  झाले.(Wedding Procession In JCB Viral Video: हिमाचल प्रदेशात हिमवृष्टीत अडकलेल्या नवरदेवाची चक्क JCB मधून वरात Watch Video) 

व्हायरल झालेला व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. सप्टेंबर महिन्यात शेअर करण्यात आलेल्या या व्हडिओला आतापर्यंत लाखो जणांनी पसंद केले आहे. यावर मजेशीर प्रतिक्रिया सुद्धा युजर्सने दिल्या आहेत. एका युजरने असे म्हटले की, ऐवढे पैसे उडवायची काय गरज होती. तर आणखी एका युजरने म्हटले की, शिक्षा मिळाली ना?

 

View this post on Instagram

 

A post shared by DIVYA SHARMA ™ (@divusharma_9)

व्हायरल झालेल्या व्हिडिओत असे दिसून येत आहे की, स्टेजवर नव वधू-वर बसले असून दोन व्यक्ती त्यांच्यावर नोटांचा पाऊस  पाडत आहेत. मात्र अचानक एकजण खाली पडतो. यामुळे नवरा चांगलाच संतापतो आणि त्याला जोरात बाजूला ढकलतो.