IPL Auction 2025 Live

Man Falls Victim to AI Voice Scam: 'बेटा, तुझा पप्पा बोलतोय, 40 हजार ट्रान्सफर कर ना', एआयच्या माध्यमातून आवाज बदलून फसवणूक

येथे माडियाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) द्वारे आवाज बदलून भामट्याने एका तरुणाची ४० हजार रुपयांची फसवणूक केली आहे. डीसीपी नॉर्थ झोन अभिजीत आर शंकर यांनी सांगितले की, शैलेंद्रला त्याच्या वडिलांच्या आवाजात एका अनोळखी नंबरवरून कॉल आला होता.

Mobile Phone Representational Image (Photo Credits: Pixabay)

Man Falls Victim to AI Voice Scam: उत्तर प्रदेशातील लखनऊमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे माडियाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) द्वारे आवाज बदलून भामट्याने एका तरुणाची ४० हजार रुपयांची फसवणूक केली आहे. डीसीपी नॉर्थ झोन अभिजीत आर शंकर यांनी सांगितले की, शैलेंद्रला त्याच्या वडिलांच्या आवाजात एका अनोळखी नंबरवरून कॉल आला होता. फोन करणाऱ्याने वडील बोलत असल्याचे सांगितले. त्यांना काही इमर्जन्सी आहे आणि त्यांना त्वरित 40 हजार रुपये खात्यात ट्रान्सफर करावेत. त्या व्यक्तीचा आवाज अगदी त्याच्या वडिलांसारखा होता. त्यामुळे शैलेंद्रला अजिबात संशय आला नाही आणि त्याने लगेच पैसे पाठवले. हे देखील वाचा: TRAI चे मोठे पाऊल, Spam आणि Fraud Calls करणाऱ्या कॉल्सवर बंदी, बल्क कनेक्शन असलेल्या व्यवसायांना ब्लैकलिस्ट यादीत टाकण्याच्या सूचना

मात्र शैलेंद्रने घरी येऊन याबाबत वडिलांशी बोलले असता, त्यांनी पैशांसंदर्भात कोणताही फोन केला नसल्याचे  सांगितले. हे ऐकून शैलेंद्रला धक्काच बसला.

सध्या याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू करण्यात आला आहे. पोलिसांनी आयपी ॲड्रेस आणि बँक डिटेल्सवरून आरोपींचा शोध सुरू केला आहे. मात्र, एआयच्या माध्यमातून आवाज बदलून फसवणुकीची ही पहिलीच घटना नाही. यापूर्वीही अशी अनेक प्रकरणे समोर आली आहेत.

एआय व्हॉईस स्कॅममध्ये फसवणूक करणारे एआयच्या मदतीने दुसऱ्या व्यक्तीचा आवाज तयार करतात. यानंतर ते कुटुंबातील सदस्य, मित्र किंवा कार्यालयातील सहकारी असल्याचे भासवून पैशांची मागणी करतात.