लहान मुलीच्या गळ्याभोवती किंग कोबरा चा 2 तास वेढा नंतर चावा; थरकाप उडवणाऱ्या घटनेचा व्हिडिओ व्हायरल

किंग कोबराच्या चावण्याने काही वेळात व्यक्तीचा मृत्यू होऊ शकतो. सापाच्या चावण्याने प्रत्येक वर्षी अनेक लोकांचा मृत्यू होतो. परंतु, किंग कोबरा चावल्यानंतरही कोणाचा जीव वाचला असल्याचे तुम्ही ऐकले आहे का?

Sand Boa Snake | Image Used for representational purpose only । (Photo Credits: Pixabay)

सापांच्या विविध जातींपैकी किंग कोबरा (King Cobra) साप सर्वात विषारी मानला जातो. किंग कोबराच्या चावण्याने काही वेळात व्यक्तीचा मृत्यू होऊ शकतो. सापाच्या चावण्याने प्रत्येक वर्षी अनेक लोकांचा मृत्यू होतो. परंतु, किंग कोबरा चावल्यानंतरही कोणाचा जीव वाचला असल्याचे तुम्ही ऐकले आहे का? महाराष्ट्रातील (Maharashtra) वर्धा (Wardha) येथून एक हैराण करणारी घटना समोर येत आहे. लहान मुलीच्या गळ्याभोवती किंग कोबराने 2 तास घट्ट वेढा दिला आणि त्यानंतर मुलीला चावला. यानंतरही ती मुलगी बचावली. (साप चावल्याने संतप्त झालेल्या व्यक्तीने केले 'हे' विचित्र कृत्य, वाचा नक्की काय घडले)

चार दिवसांच्या उपचारानंतर मुलगीची प्रकृती आता सुधारली आहे. अंगावर काटा आणणाऱ्या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हयरल होत आहे. सोशल मीडियात व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओत पूर्वा गडकरी नामक 6 वर्षांच्या मुलीच्या गळ्याभोवती सापाने वेढा दिलेला िदसत आहे. (Snake Viral Video: उंदीर पकडण्याच्या नादात दुकानदाराच्या अंगावर पडला साप, पाहा व्हिडिओ)

व्हिडिओत तुम्ही पाहू शकाल की, लहान मुलगी झोपली आहे. तेव्हा तिच्या अंगावर साप येऊन बसलेला दिसत आहे. परंतु, साप उत्तेजित होऊ नये म्हणून ती निपचित पडून राहिली आहे. सर्पमित्र येऊन सापाला पकडत नाहीत तोपर्यंत मुलीला निपचित पडून राहण्यास घरातल्यांनी सांगितले आहे. त्यामुळे ती चिमुकली तब्बल 2 तास निपचित पडून राहिली. परंतु, जेव्हा तिला वाटले की साप लांब जात आहे तेव्हा ती थोडी हलली आणि तितक्यातच साप तिला चावला. त्यानंतर मुलीला तातडीने जवळच्या हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. आता मलुची स्थिती उत्तम आहे.