लखनऊ: Uber चालकाने गायलेलं आशिकी सिनेमातील 'नजर के सामने' गाणं ऐकून व्हाल थक्क; रानू मंडल नंतर आणखीन एक सोशल मीडिया स्टार (Watch Video)

आपल्या उदरनिर्वाहासाठी उबर चालवणाऱ्या विनोद नामक तरुणाचा आशिकी (Aashiqui) सिनेमातील नजर के सामने (Nazar Ke Samane) गाणे गातानाचा एक व्हिडीओ ट्विटर वर एका युजरने पोस्ट केला होता.यानंतर काही क्षणातच हा व्हिडीओ तुफान व्हायरल होऊ लागला

Vinod, an Uber driver for India beautifully sings Aashiqui song (Photo Credits: Instagram/Twitter)

एक व्हायरल व्हिडिओ (Viral Video) एखाद्याच आयुष्य पार पालटून टाकू शकतं याचं उत्तमी उदाहरण म्हणजे रानू मंडल (Ranu Mondal).. एका रात्रीत पश्चिम बंगाल (West Bengal) च्या कुठल्यातरी स्टेशनवर गाणारी ही महिला रातोरात सोशल मीडियावर जादू सारखी पसरली होती. यानंतर खरंतर अनेक हौशी कलाकरांना उमेद मिळाली आणि लागोपाठ नवनवीन टॅलेन्ट समोर येऊ लागले. यातीलच एक नवीन प्रसंग लखनऊ (Lucknow)मध्ये पाहायला मिळाला. आपल्या उदरनिर्वाहासाठी उबर चालवणाऱ्या विनोद नामक तरुणाचा आशिकी (Aashiqui) सिनेमातील नजर के सामने (Nazar Ke Samane) गाणे गातानाचा एक व्हिडीओ ट्विटर वर एका युजरने पोस्ट केला होता.यानंतर काही क्षणातच हा व्हिडीओ तुफान व्हायरल होऊ लागला, इतका की आता हा विनोद सुद्धा नवीन राणू मोंडल बनणार की काय अशा चर्चा सोशल मीडियामध्ये सुरु झाल्या आहेत.

विनोद च्या सुरेल आवाजात नजर के सामने

ट्विटर युजरने शेअर केलेल्या ट्विट मध्ये विनोद हा आपल्या नावानेच एक युट्युब चॅनेल सुद्धा चालवत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्या पेजची अधिकृत लिंक दिलेली नसली तरी आम्ही खास तुमच्यासाठी त्याचा सुद्धा शोध घेतला आहे. या यूट्यूबच्या व्हिडिओमध्ये विनोद अतिशय सुरेल आवाजात उदित नारायण, कुमार सानू यांची गाणी गाताना पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे ही रेकॉर्डिंग्स सुद्धा त्याने आपल्या उबर चालकाच्या ड्युटी दरम्यानच केल्याचे दिसत आहे.

पहा विनोदचे युट्युब पेज

(अभिनेत्री अनुष्का शर्मा ने शेअर केलेले बालपणीनचे फोटो पाहून विराट कोहली झाला थक्क, फोटोंना दिली अशी Cute कमेंट)

शाहरुख फॅन्ससाठी खास व्हिडीओ

रानू मंडलच्या बॉलिवूड एंट्रीनंतर आता कदाचित प्रत्येकालाच सोशल मीडियाची ताकद लक्षात आली असेल. अशाच प्रकारे या टॅलेंटला सुद्धा पाठिंबा देऊन तुम्ही एक योग्य स्थानी पोहचवायला मदत करू शकता त्यासाठी फक्त हा व्हिडीओ शेअर करण्याची गरज आहे.