लंडन: जेव्हा क्रिकेट स्टेडियम मध्ये चाहते धरतात नरेंद्र मोदींचा बॅनर.. भाजपा प्रवक्ते अवधूत वाघ यांनी शेअर केला खास फोटो

Team India Fans Pose With Narendra Modi Banner (Photo Credits: Twitter)

साधरणतः कोणत्याही बड्या नेत्यांच्या नावाचे बॅनर्स गल्लोगली, प्रत्येक सिग्नलला पाहायची भारतीयांना सवयच आहे, पण यापेक्षाही पुढे जात पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या काही चाहत्यांनी चक्क लंडन (London)  मधील एका क्रिकेट स्टेडियम मध्ये मोदींचा बॅनर हातात धरल्याचा फोटो सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत.भाजपाच्या महाराष्ट्र विभागाचे प्रवक्ते अवधूत वाघ (Avdhut Vagh)  यांनी देखील स्वतः हा फोटो आपल्या ट्विटर अकाउंट वरून शेअर केला आहे, या बॅनर मध्ये केवळ मोदीच नव्हे तर चाहत्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) आणि डोंबिवलीतील नेते व सध्याचे राज्यमंत्री रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांचा सुद्धा फोटो लावला आहे. सध्या सुरु असलेल्या विश्वचषक (CWC 2019) सामन्यात हे मोदी फॅन्स टीम इंडियाला चीअर करण्यासाठी गेले होते.

सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या फोटोमध्ये टीम इंडियाची जर्सी घातलेले दोन फॅन्स हातात एक बॅनर धरून पोज देताना पाहायला मिळत आहेत. या बॅनर वर " देशात नरेंद्र, महाराष्ट्रात देवेंद्र आणि डोंबिवलीत रवींद्र असा मजकूर छापून त्याशेजारी मोदी, फडणवीस व रवींद्र चव्हाण यांचा फोटो लावण्यात आला आहे. याशिवाय बॅनर वर शिवाजी महाराज, व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा देखील फोटो छापण्यात आला आहे. नरेंद्र मोदींची क्रिकेट चाहत्यांमध्येही क्रेझ; Modi Mask घालून केला डान्स (Video Viral)

अवधूत वाघ ट्विट

दरम्यान, देश-विदेशात मोदींचे असंख्य चाहते याआधीही पाहायला मिळाले आहेत, काही दिवसांपूर्वी ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांनी सुद्धा अशाच प्रकारे मोदींसोबत एक फोटो शेअर करून कितना अच्छा है मोदी! अशा वाक्याने मोदींचे कौतुक केले होते, तर लोकसभेच्या निकालानंतर अनेक सामान्य नागरिकांनी कुठे चहावर, तर कुठे रिक्षा भाड्यावर सवलत देत मोदींचा विजय साजरा केला होता, यावरूनच नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रिय नेत्याच्या पदवीची सार्थता सिद्ध होते.