Little Girl Viral Video: मांजर रंगलंय चित्र काढण्यात, लहान मुलगी झाली शिक्षिका; व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

ज्यात एक मांजर (Cat Viral Videos) चक्क चित्र रंगवताना पाहायला मिळते आहे. महत्त्वाचे म्हणजे एक चिमुकली (Little Girl Viral Video) या मांजराची शिक्षिका आहे. तिच्या मार्गदर्शनाखालीच हा सगळा उद्योग सुरु आहे.

Cat Viral Videos | (Photo Credits: Twitter)

पाळीव प्राणी (Pets) पाळणाऱ्या बहुतेक मंडळींना त्यांच्या त्यांच्या प्राणांबद्दल फारच कौतुक असते. त्यामुळे त्या प्राणांचे विविध चाळे त्यांना आवडतात त्याचे सोशल मीडियावरुन (Social Media) अनेकदा प्रदर्शनही होते. त्यापैकी सर्वच नव्हे पण काही चांगले व्हिडिओ व्हायरल (Viral Videos of Pets) होतात. हे प्राणीही इतके बिलंदर की, माणसाच्या संगतीत राहून मानसासारखेच वागू पाहतात. सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ज्यात एक मांजर (Cat Viral Videos) चक्क चित्र रंगवताना पाहायला मिळते आहे. महत्त्वाचे म्हणजे एक चिमुकली (Little Girl Viral Video) या मांजराची शिक्षिका आहे. तिच्या मार्गदर्शनाखालीच हा सगळा उद्योग सुरु आहे.

व्हिडिओ पाहून तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटेल. पण, हे मांजरही अज्ञाधारकपणे वागते आहे. एखादा पालक जसे आपल्या पाल्ल्याचा हात हातात घेऊन त्याला अक्षरे लिहायला शिकवतो. त्याच पद्धतीने ही चिमूकली मांजराला शिकवते आहे. हात म्हणून माजराच्या पुढच्या एका पायाचा वापर केला जात आहे हे तर फारच मजेशीर आहे. (हेही वाचा, Dog VS Cat Wrestling: कुत्र्यासोबत मांजर खेळे, दोघांची शेपटी जमिनीवर लोळे, युजर्स म्हणाले 'व्वा!')

आवाज नसलेल्या १२ सेकंदांच्या क्लिपमध्ये, लहान मुलगी तिच्या हातात मांजरीचा पंजा धरते आणि जांभळ्या रंगाच्या पेन्सिलने तिच्या ड्रॉइंग बुकमध्ये स्केच रंगवते. मांजर आपला पंजा हलवते पण रेखांकन करताना पुस्तकाकडे एकदाही पाहत नाही. हे दृश्य पाहणे फारच मजेदार आहे! आणि मांजरीच्या चेहऱ्यावरील भाव दर्शवतात की तिला रंग देण्यात कवडीचेही स्वारस्य नाहीय परंतु मुलीला ते ती केवळ प्रेमापोटी करू देते.

ट्विटरवर @buitengebieden नावाच्या हँडलवर शेअर करण्यातआलेला हा व्हिडिओ नेटीझन्सना चांगलाच आवडला आहे. व्हिडिओ पाहून अनेकांनी त्याला मजेशीर प्रतिक्रियाही दिल्या आहेत. दोन दिवसांपूर्वी ट्विटरवर शेअर केलेल्या या व्हिडिओला आतापर्यंत 10.3 दशलक्षाहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. त्यावर ट्वीपलकडून अनेक कमेंट्सही आल्या आहेत.