Love You Zindagi गाणं ऐकत कोरोनाशी झगडणारी 'त्या' मुलीची झुंज अखेर संपली! व्हायरल झालेल्या व्हिडिओतील मुलीचा करुण अंत

मात्र तिची कोरोनाशी झुंज अखेर गुरुवारी रात्री संपली. कोरोनाशी लढत असताना तिचा करुण अंत झाला आहे.

Love you Zindgi Girl (Photo Credits: Twitter)

देशात कोरोनाने हाहाकार माजविला असून याच्याविरुद्ध संपूर्ण देशवासियांची एक मोठी लढाई सुरु आहे. ना कोरोनाने हार मानली आणि ना देशवासियांनी... कोरोनाला हरविण्यासाठी नागरिक तसेच रुग्ण सर्व प्रयत्न करत आहे. या संदर्भातील अनेक व्हिडिओ व्हायरल (Viral Video) होत आहेत. त्यात दिल्लीतील एका रुग्णालयातील तरुणीचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. ज्यात एक तरुणी ICU मध्ये कोरोनावर उपचार घेत असताना 'लव यू जिंदगी' (Love you Zindgi) हे गाणे ऐकत होती. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नेटक-यांकडून तिच्या हिंमतीचे कौतुक केले जात होते. मात्र तिची कोरोनाशी झुंज अखेर गुरुवारी रात्री संपली. कोरोनाशी लढत असताना तिचा करुण अंत झाला आहे.

ज्या डॉक्टरांनी तिचा व्हिडिओ शेअर केला होता त्यांनीच तिच्या मृत्यूची माहिती दिली आहे. डॉ. मोनिका लांगेह यांनी कोरोना इर्मजन्सी वॉर्डमधून 30 वर्षाच्या या तरुणीचा व्हिडिओ शेअर केला होता. जी कोरोना संक्रमित असून कोरोनाशी झुंज देत होती. या मुलीने स्वत:चे मनोबल वाढविण्यासाठी गाणे लावण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानुसार तिला शाहरुख खान आणि आलिया भट्टच्या 'लव्ह यू जिंदगी' चे गाणे लावून देण्यात आले होते. जे ऐकल्यावर तिने बेडवरच ताल धरला होता.हेदेखील वाचा- Jugaad Ambulance In Pune: पुण्यात रिक्षा चालक 'जुगाड अ‍ॅम्ब्युलंस' द्वारा कोविड19 च्या रूग्णांना देत आहेत आधार

गुरुवारी रात्री डॉ. मोनिका लांगेहने ट्विटर लिहिले की, "खूपच दु:खद बातमी. त्या शूर मुलीला आपण गमावून बसलो."

हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला. त्या मुलीच्या जिद्दीची आणि आत्मविश्वासाची सर्वजण स्तुती करत होते. मात्र तिचा असा करुण अंत झाल्यानंतर नेटक-यांनी त्या शूर मुलीला श्रद्धांजली वाहिली.