सुषमा स्वराज सोबतच सोशल मीडियावरही कुवेत गायकाच्या आवाजातील वैष्णव जन तो... भजनाला वहवा ! ( Video)

भजानाच्या काही ओळी सुषमा स्वराज यांच्यासमोर गुणगुणल्या.

सुषमा स्वराज आणि कुवेत गायक मुबारक-अल-रशिद Photo Credit ANI

महात्मा गांधी हे भारताचे राष्ट्रपिता आहेत, त्यांनी जगाला अहिंसेचा मंत्र दिला. यंदा 2 ऑक्टोबरला महात्मा गांधींजींची 150 वी जयंती साजरी करण्यात आली. या निमित्ताने जगभरातील गायकांनी बापूजींचं अत्यंत आवडीचं भजन 'वैष्णव जन तो' हे त्यांच्या सुरात आणि स्टाईलमध्ये गायलं होतं. सुषमा स्वराज यांच्या कुवेत दौर्‍यामध्येही एका गायकाने या भजनाच्या काही ओळी गुणगुणल्या आहेत. त्याची सोशल मीडियावर चर्चा आहे. नक्की पहा : जगभरातील 124 देशातील गायकांच्या आवाजात पुन्हा निनादले 'वैष्णव जण तो.. ' चे सूर

भारताच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज सध्या कुवेतच्या दौर्‍यावर आहेत. या दौर्‍यादरम्यान मुबारक-अल-रशिद या स्थानिक गायकाने भजानाच्या काही ओळी सुषमा स्वराज यांच्यासमोर गुणगुणल्या. उपस्थितांसोबतच सुषमा स्वराज यांनी रशिदच्या प्रयत्नांना दाद दिली. गाण्यादरम्यान टाळ्या वाजवून त्यांनी रशिदचं कौतुक केलं.

सुषमा स्वराज सध्या चार दिवसांच्या आखाती देशांच्या दौर्‍यावर आहे. कुवेतच्या भारतीय दुतावासात एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळेस रशिद यांनी खास भजन सादर केलं.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif