जपान: Sex Doll वर केले जातात अंत्यसंस्कार; खर्चाचा आकडा ऐकुन व्हाल चकित

या कामासाठी थोडेथोडके नव्हे तर त्यांनी 630 पाउंडपर्यंत खर्च मागितला आहे.

Sex Doll Funeral (Photo Credits: Unspalsh)

बाहुल्यांमध्ये सुद्धा जीव असतो असं म्हंटल तर तुमचा विश्वास बसेल का? हा काही भुतबाधेचा प्रकार आहे असं म्ह्णून अनेकजण घाबरून सुद्धा बसतील मात्र जपान (Japan) मध्ये ही समजूत अगदी सामान्य आहे. अलीकडेच समोर आलेल्या माहितीनुसार, जपान मध्ये चक्क एका सेक्स डॉलवर (Sex Doll) अंत्यसंस्कार करण्याची जबाबदारी एका कंपनीकडून स्वीकारण्यात आली आहे. 'ह्यूमन लव्ह डॉल' (Human Love Doll) असे या कंपनीचे नाव असून, या कामासाठी थोडेथोडके नव्हे तर त्यांनी 630 पाउंडपर्यंत खर्च मागितला आहे. या कामासाठी एका अधिकृत पॉर्नस्टार ला नेमून तिच्या हस्ते प्रार्थना व सर्व अंत्यविधी करून सेक्स डॉलला अलविदा केले जाते. चक्क एका विमानासोबत 6 महिन्यांपासून रिलेशनशिपमध्ये आहे ही युवती; लवकरच करणार लग्न, तयारी सुरु

मानवी शरीरासारख्या दिसणाऱ्या या बाहुल्या असतात. त्यामुळे त्यात खरोखरच जीव आहे असे वापरणाऱ्यांकडून मानले जाते. या बाहुल्यांचा जेव्हा वापर करणे बंद होते तेव्हा तिला कचऱ्यात फेकून देणे या लोकांकडून असंवेदनशील मानले जाते. म्ह्णूनच एका मशीनमध्ये टाकून ही बाहुली नष्ट करण्याची पद्धत आहे, मात्र ज्यांचे या बाहुल्यांसोबत अधिक भावनिक नाते असते ते व्यक्ती या सेक्स डॉलला अगदी मानवी पद्धतीने नष्ट करतात. अशा प्रकारच्या अंत्यसंस्कारामध्ये सेक्स डॉलला डिस्मेंटल करून एका-एका वेळेला तिचा एक एक भाग नष्ट केला जातो. छोट्या फिमेल डॉल्सला चारी बाजूंनी फुलांनी कव्हर करून ठेवले जाते.

दरम्यान, जपानमध्ये सेक्स डॉल या अत्यंत उघडपणे विकल्या व वापरल्या जातात, दरवर्षी सुमारे २००० सेक्स डॉलची विक्री होते. या बाहुल्यांचा जन्म प्रेम देण्यासाठी झालेला असतो, त्यामुळे त्यांचा अंत सुद्धा प्रेमानेच व्हावा अशी या अंत्यसंस्काराच्या प्रथेमागची भावना आहे, मात्र त्यासाठी इतका मोठा खर्च करणे ही बाब सामन्यांच्या पचनी पडण्यास कठीण आहे.