Is Annabelle Doll Real? एनाबेल डॉल खरी आहे का? जाणून घ्या 'कॉन्ज्यूरिंग' फेम झपाटलेल्या बाहुलीची खरी कथा
एनाबेल डॉल ही अशी बाहुली आहे, जीचं नाव ऐकल्यानंतर भल्याभल्याना घाम फुटतो. या भूतिया बाहुलीच्या जीवनावर आधारित 'द कान्जरिंग' (Conjuring) या चित्रपटाची निर्मितीदेखील करण्यात आली होती. तुम्हाला या चित्रपटातील बाहुलीविषयी अजूनही माहिती नसेल किंवा तुम्हाला ही बाहुली खरचं खरी आहे का? असा प्रश्न पडला असेल, तर तुम्हाला या लेखातून त्याच उत्तर मिळणार आहे.
Annabelle Doll: तुम्हाला जर हॉरर कथा, चित्रपट पाहायला आवडत असतील तर आम्ही आज तुमच्यासाठी प्रसिद्ध एनाबेल डॉल (Annabelle Doll) ची कहाणी जाणून घेणार आहोत. एनाबेल डॉल ही अशी बाहुली आहे, जीचं नाव ऐकल्यानंतर भल्याभल्याना घाम फुटतो. या भूतिया बाहुलीच्या जीवनावर आधारित 'द कान्जरिंग' (Conjuring) या चित्रपटाची निर्मितीदेखील करण्यात आली होती. तुम्हाला या चित्रपटातील बाहुलीविषयी अजूनही माहिती नसेल किंवा तुम्हाला ही बाहुली खरचं खरी आहे का? असा प्रश्न पडला असेल, तर तुम्हाला या लेखातून त्याच उत्तर मिळणार आहे.
सध्या सोशल मीडियावर एनाबेल डॉल कनेक्टिकट संग्रहालयातून पळून गेल्याची बातम्या येत आहेत. परंतु, ही केवळ एक अफवा आहे. चला तर मग एनाबेल डॉलची खरी कहाणी जाणून घेऊयात...(हेही वाचा - Journalist Shirish Date: भारतीय वंशाचे पत्रकार शिरीष दाते यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्पला विचारला 'हा' प्रश्न; राष्ट्राध्यक्ष म्हणाले 'पुढचा प्रश्न')
एनाबेल डॉल ही एक रॅगेडी एन बाहुली (Raggedy Ann doll) आहे. या बाहुलीचे लाल रंगाचे केस आहेत. या बाहुलीची कहाणी 1970 च्या दशकातील आहे. डोना नावाच्या एका विद्यार्थी नर्सला तिच्या आईने एक बाहुली गिफ्ट केली होती. डोना आपल्या रुममेट सोबत राहत होती. त्यानंतर काही दिवसांनंतर या दोघांनी बाहुलीला चालताना पाहिलं. ही बाहुली स्वत:हून आपली जागा बदत होती. ही बाब अत्यंत भीतीदायक होती. हा सर्व प्रकार पाहून या बाहुलीत कोणाचा तरी आत्मा असल्याचं डोना आणि तिच्या मैत्रीणीला जाणवलं.
या बाहुलीमध्ये एनाबेले हिगिंस नावाच्या एका मुलीची आत्मा होती. ही मुलगी डोनाच्या घराशेजारी राहत असे. एका कार अपघातात तिचा मृत्यू झाला होता. एकदा या बाहुलीने डोनाच्या प्रियकरावर हल्ला केला. त्यानंतर डोनाने पॅरानॉर्मल एक्टिविटी एक्सपर्ट लॉरेन वॉरेन आणि अॅड वॉरेन यांची मदत घेतली.
वॉरेन दाम्पत्याने ही बाहुली झपाटलेली असल्याचे सांगताच डोना आणखीनच घाबरून गेली. तिची ही भीती पाहून वॉरेन दाम्पत्याने ही बाहुली आपल्यासोबत नेऊन तिला त्यांच्या खासगी ‘ऑकल्ट म्युझियम’ मध्ये घेऊन जाण्याचा निर्णय घेतला. ते आपल्यासोबत ही बाहुली गाडीमधून घेऊन जात असताना बाहुलीने त्यांना सर्वतोपरी अडविण्याचा प्रयत्न सुरु केला. मोठ्या मुश्कीलीनेच वॉरेन दाम्पत्य कसेबसे म्युझियममध्ये पोहोचले. त्यानंतर पवित्र मंत्रांचे उच्चारण करीत त्यांनी ती बाहुली एका काचेच्या कपाटामध्ये कुलुपबंद करून टाकली. तेव्हापासून ही बाहुली त्या संग्रहालयामध्येचं आहे. या बाहुलीमध्ये आजही नकारात्मक शक्ती जागृत असल्याचे म्हटले जाते. त्यामुळेच या बाहुलीच्या जवळ जाण्याची किंवा तिला स्पर्श करण्याची परवानगी दिली जात नाही.