International Condom Day 2019: आंतरराष्ट्रीय कंडोम डे दिवशी सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत 'हे' मजेदार मीम्स
कंडोम या गोष्टीकडे पाहण्याचा आणि समाजात खुलेपणाने बोलताना लोकांना आजही संकोच वाटतो.
International Condom Day 2019: 13 फेब्रुवारी हा दिवस जगभरात International Condom Day म्हणून साजरा केला जातो. कंडोम या गोष्टीकडे पाहण्याचा आणि समाजात खुलेपणाने बोलताना लोकांना आजही संकोच वाटतो. लोकसंख्या नियंत्रणापासून ते अगदी एड्स (AIIDS) आणि लैंगिक आजार (STDs) यांना आटोक्यात ठेवण्यासाठी 'कंडोम'(Condom) ही अत्यंत आवश्यक गोष्ट आहे. दरवर्षी एका विशिष्ट थीमवर या दिवसाचं सेलिब्रेशन अवलंबून असतं. 2019 च्या आंतरराष्ट्रीय कंडोम डे दिवशी Safer is Sexy या विषयाला घेऊन समाजात जनजागृती केली जाणार आहे.
पुरेशी काळजी न घेतल्याने लैंगिक आजार आणि एड्सच्या विळख्यात अनेकजण अडकत त्यामुळे वेळीच या आजारांवर उपचार केल्यास त्यावर मात करणं शक्य आहे. पण भारतामध्ये या विषयाबद्दल खुलेपणा नाही. त्यामुळे अनेकजण याविषयाची थट्टा-मस्करी, जोक, मिम्स व्हायरल होत आहेत.
सध्या सर्वत्र व्हेलेंटाईन डेच्या गुलाबी हवेची धूम आहे. तुमच्या सिंगल फ्रेंड्ससोबत हे मजेदार मिम्स आज शेअर करा आणि थोडं स्माईल शेअर करा.