Not a Match! 78 वर्षीय व्यक्तीचे 17 वर्षीय मुलीसोबत लग्न; अवघ्या 22 दिवसांत घटस्फोट
अनेक बंधन झुगारुन प्रेमाखातर लग्न केलेली अनेक जोडपी तुम्ही पाहिली असतील. वयातील मोठे अंतरही लग्नाच्या आड येत नाही. अशी अनेक उदारहणं आपल्याकडे आहेत. परंतु, इंडोनेशिया मधून एक अचंबित करणारी घटना समोर येत आहे.
लग्न म्हणजे दोन जीवांचं मिलन. अनेक बंधन झुगारुन प्रेमाखातर लग्न केलेली अनेक जोडपी तुम्ही पाहिली असतील. वयातील मोठे अंतरही लग्नाच्या आड येत नाही. अशी अनेक उदारहणं आपल्याकडे आहेत. परंतु, इंडोनेशिया (Indonesia) मधून एक अचंबित करणारी घटना समोर येत आहे. एका 78 वर्षीय वक्तीने गेल्या महिन्यात 17 वर्षांच्या मुलीसोबत लग्न केले होते आणि एका महिन्याच्या आत ते एकमेकांपासून विभक्त झाले. लग्नाला केवळ 22 दिवस झाल्यानंतर गेल्या आठवड्यात त्यांनी एकमेकांपासून घटस्फोट घेतला. (चक्क एका विमानासोबत 6 महिन्यांपासून रिलेशनशिपमध्ये आहे ही युवती; लवकरच करणार लग्न, तयारी सुरु)
हरियन मेट्रो (Harian Metro) नुसार, 78 वर्षीय अबाह सरना (Abah Sarna) आणि 17 वर्षीय नोनी नविता (Noni Navita) यांनी गेल्या महिन्यात विवाह केला. दोघांच्या वयातील मोठ्या अंतरामुळे या विवाहाने अनेकांचे लक्ष वेधले. परंतु, लग्नाला अवघे 22 दिवस झाल्यानंतर अबा यांनी घटस्फोटाची नोटीस नोनी हिला पाठवल्याने कुटुंबियांनाही धक्का बसला आहे. यासंदर्भात नोनीचे बहिण इयान (Iyan) हिने सांगितले की, "त्या दोघांमध्ये कोणतेही भांडन नसल्याने अचानक आलेल्या घटस्फोटाच्या नोटीसमुळे आम्हा सगळ्यांना धक्का बसला. दोघांच्या वयात इतके मोठे अंतर असूनही कुटुंबियाचा लग्नाला विरोध नव्हता. मात्र अबाह यांच्या कुटुंबियांनी या लग्नावर नाराजी व्यक्त केली होती."
पहा व्हिडिओ:
दरम्यान, नोनी लग्नाआधीपासूनच गरोदर असल्याचा आरोप तिच्यावर केला जात आहे. परंतु, नोनी च्या बहिणीने हे खरे नसल्याचे म्हटले आहे. दरम्यान, लग्नापूर्वी अबाह यांनी नोनी साठी खूप सामान पाठवले होते. त्यात एक मोटारसायकल, गादी, कपाट होते. रिपोर्ट्सनुसार, नोनीच्या कुटुंबियांना हुंड्यात अबाहकडून मोठी रक्कमही मिळाली होती.