Tik Tok Film Festival: पुणे शहरात रंगणार देशातील पहिला टिक टॉक चित्रपट महोत्सव

देशभरातील अशा पद्धतीचा हा पहिलाच 'टिक टॉक चित्रपट महोत्सव' असल्याचा दावाही आयोजकांनी केला आहे. दरम्यान, आपल्याला माहिती असेलच सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातून झालेली टीका त्यानंतर मद्रास उच्च न्यायालयाने बंदी घातली होती.

Tik Tok | (Photo credit: archived, modified, representative image)

India's First TikTok Film Festival in Pune: पुणे तिथे काय उणे हे आपण नेहमीच ऐकतो. बुद्धीवंतांचे आणि विद्येचे माहेरघर असलेल्या या पुण्याने आपल्या विविध कृतींनी हे अनेकदा दाखवूनही दिले आहे. आपल्या विविध कलागुणांमुळे पुणं पुन्हा एकाद चर्चेत आले आहे. देशभरात वादग्रस्त ठरलेल्या टिक टॉकला पुणे आता वेगळ्या पद्धतीने समजून देऊ पाहात आहे. पुणे (Pune) शहरात पहिला 'टिक टॉक चित्रपट महोत्सव' (Tik Tok Film Festival) पार पडत आहे. विशेष म्हणजे हा फेस्टीवल पूर्णपणे नियोजनबद्धरित्या पार पडणार आहे. इतकेच नव्हे तर या महोत्सवमध्ये रुपये 3333 ते 33 हजार रुपयांपर्यंतची बक्षीसंही ठेवण्यात आली आहेत. देशभरातील अशा पद्धतीचा हा पहिलाच 'टिक टॉक चित्रपट महोत्सव' असल्याचा दावाही आयोजकांनी केला आहे. दरम्यान, आपल्याला माहिती असेलच सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातून झालेली टीका त्यानंतर मद्रास उच्च न्यायालयाने बंदी घातली होती. नंतर ती हटविण्यात आली.

पुणे येथील घोले रोड येथे हा फेस्टीवल 21 डिसेंबर रोजी पार पडणार आहे. घोले रोडवर असलेल्या नेहरु हॉलमध्ये 'टिक टॉक चित्रपट महोत्सव' साजरा होईल. या फेस्टवलमध्ये सहभाग नोंदविण्यासाठी इच्छुकांनी 20 ऑगस्ट पर्यंत आपले व्हिडिओ पाठविण्याचे अवाहन आयोजकांनी केले आहे. जर आपल्याला या फेस्टीवलमध्ये आपली टीक टॉक शॉर्ट चित्रपट सहभागी करायची असेल. तर, त्यासाठी आयोजकांनी ठरवून दिलेले शुल्क भरावे लागेल. टिक टॉक चित्रपट महोत्सव आयोजक प्रकाश यादव यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटले आहे की, टीक टॉक युजर्ससाठी हा फेस्टीवल मोठी पर्वणी असणार आहे. जगभरातील लोकांना युजर्स दाखवू शकतात की आपण काय बनवले आहे.पुढे बोलताना ते सांगतात की, टीक टॉक युजर हा स्वत: कॅमेरामनही आहे, दिग्दर्शकही आहे आणि निर्माताही आहे.

दरम्यान, टिक टॉक चित्रपट महोत्सव आयोजित करण्याची कल्पना आपल्या डोक्यात कशी आली? असे विचारता प्रकाश यादव सांगतात की, मी महाविद्यालयीन तरुणांना नेहमीच पाहात असतो. ते खूप सारे व्हिडिओ बनवत असतात. त्यातील अनेक व्हिडिओ हे नवनव्या संकल्पनांनी भारलेले असतात. त्यामुळे मला वाटले या तरुणांना संधी मिळायला हवी. त्यासाठी एक व्यासपीठ असायला हवे. चित्रपट महोत्सवसाठी प्रवेश घेण्यासाठी प्रवेशिका मागविल्या आहेत. यात पुरस्कारासाठी अनेक श्रेणी आहेत. ज्यात बेस्ट इन कॉमेडी, बेस्ट इन प्रँक आणि सामाजिक जनजागृती अशा श्रेणींचा समावेश आहे. (हेही वाचा, All about TikTok: तुम्हीपण 'टिक टॉक' Video बनवता? मग आगोदर वयाचा अंदाज घ्या)

दरम्यान, पुढे बोलताना प्रकाश यादव यांनी सांगितलेकी, दर्जेदार चित्रपट्सची निवड करण्यासाठी एक निवडसमिती बनविण्यात आली आहे. जी 5 सेकंद ते 1 मनिट इतक्या कालावधीतील व्हिडिओचे परिक्षण करेन. विजेत्यास 33,333 रुपयांची रक्कम बक्षीस म्हणून दिली जाईल. जी या महोत्सवमधील बक्षीस रकमेतील सर्वाधिक आहे. या महोत्सव 3,333 ते 33,333 रुपये इतक्या प्रमाणात बक्षिस रक्कम ठेवण्यात आली आहे. निवड समितीत काही अभिनेते आणि दिग्दर्शकांचाही समावेश आहे. अशा प्रकारचा एक महोत्सव होत आहे हे समजताच अनेक युजर्सनी टिक टॉक चित्रपट महोत्सवमध्ये सहभाग नोंदवल्याचा दावाही आयोजकांनी केला आहे.