भारतीय रेल्वेमध्ये नोकरीच्या संधीची Avestran Infotech कडून देण्यात आलेली जाहिरात FAKE; Indian Railways ने केला खुलासा
भारतीय रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, अवेस्ट्रान इन्फोटेकच्या जाहिरातीप्रमाणे नोकर्या आऊटसोर्स केलेल्या नाहीत.
भारतीय रेल्वेमध्ये नोकरभरतीचे अधिकार केवळ रेल्वे मंत्रालयाला असून कोणत्याही खाजगी यंत्रणांकडून नोकरभरतीची जाहिरात दिली जात नसल्याचं सांगत अवेस्ट्रान इन्फोटेक (Avestran Infotech) कडून वर्तमानपत्रात दिलेल्या जाहिरातीवर खुलासा केला आहे. भारतीय रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, अवेस्ट्रान इन्फोटेकच्या जाहिरातीप्रमाणे नोकर्या आऊटसोर्स केलेल्या नाहीत. तसेच जाहिरातीमध्ये लिंगानुसार भेदभाव आहे. तसा भेदभाव भारतीय रेल्वे करत नाही. असा दावा केला आहे. त्यामुळे अवेस्ट्रान इन्फोटेकच्या जाहिरातीमधील दावा खोटा असल्याचं सांगितलं आहे.
दरम्यान अवेस्ट्रान इन्फोटेकच्या जाहिरातीमध्ये 5हजार 285 जागांसाठी 8 विविध कॅटेगरीमध्ये नोकरभरती होणार असून हे 11 वर्षांचं कॉन्ट्रॅक्ट असेल असे सांगण्यात आले होते. इच्छुक उमेदवारांना 750 रूपये फी डिपॉझिट आहे तसेच 10 सप्टेंबर पर्यंत अर्ज करू शकता असे सांगण्यात आले होते. www.avestran.in वर अर्ज करण्याच्या सूचना होत्या.
PIB Tweet
भारतीय रेल्वेमध्ये सी आणि डी ग्रुपमधील कर्मचार्यांची भरती करण्यासाठी Railway Recruitment Boards आणि 16 अन्य Railway Recruitment Cell आहेत. त्यांच्यामाध्यमातूनच नोकरभरती केली जाते. तसेच रेल्वेतील नोकर भरती ही Employment News आणि रोजगार समाचार मधून देखील प्रसिद्ध होते. तसेच ऑनलाईन नोकरभरतीबद्दल RRBs आणि RRCs च्या माध्यमातून नोटिफिकेशन जारी करण्यात येते.
दरम्यान खाजगी कंपन्यांना भारतीय रेल्वे कोणतीही नोकरभरती करण्यासाठी कंत्राट देत नसल्याने
अवेस्ट्रान इन्फोटेकच्या जाहिरातीबद्दल तपास करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे. दोषींवर देखील नियमांनुसार कारवाई केली जाणार असल्याचं सांगण्यात आले आहे.