Surgical Stike2: 'तुम्ही निवांत झोपा, पाकिस्तान आर्मी जागी आहे'; सोशल मीडियावर पाकिस्तान आर्मीच्या ट्विटची खिल्ली
हा हल्ला मंगळवारी पहाटे 3 वाजता करण्यात आला. सर्व विरोधी पक्षांना या हल्ल्याबाबत माहिती देण्यात आली. या हल्ल्यात एकूण किती दहशतवादी ठार झाले, याबाबत माहिती मिळू शकली नाही. मात्र, या हल्ल्यात सुमारे 200 ते 300 दहशतवादी ठार झाल्याचे सांगितले जात आहे.
Surgical Stike2: पाकिस्ताच्या हद्दीत घुसून भारताने पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला. भारतीय वायुदलाच्या (Indian AirForce) खास 12 विमानांनी मंगळवारी (26 फेब्रुवारी) पहाटे POK मध्ये प्रवेश केला. या विमानांनी काही मिनिटांमध्येच जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेची कंट्रोल रुम असलेला दहशतवादी तळ पुरता उदद्ध्वस्त केला. या कारवाईत सुमारे 200 ते 300 दहशतवादी मारले गेल्याचे सांगितले जात आहे. भारताने केलेली कारवाई पाहून पाकिस्तान कमालीचे हडबडून गेले आहे. पाकिस्तान (Pakistan) सरकारवर जनता प्रश्नांचा भडीमार करत आहे. या सर्वात पाकिस्तान डिफेन्स नावाच्या ट्विटर हॅंडलवरील ट्विटवर अत्यंत मजेशीर प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. लेटेस्टली या ट्विटर हॅंडलच्या अधिकृततेची पुष्टी करत नाही. पाकिस्तान संरक्षण डिफेन्सच्या ट्विटची सोशल मीडियात जोरदार खिल्ली उडवली जात आहे.
पाकिस्तान डिफेन्सने पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तानी जनतेला उद्देशून एक ट्विट केले होते. या ट्विटमध्ये म्हटले होते की, तुम्ही आरामात झोपा. पाकिस्तान एअरफोर्स जागी आहे. दरम्यान, भारतीय हवाई दलाची विमाने वाऱ्याच्या वेगाने गेली आणि आपली मोहीम फत्ते करुन परतही आली. भारताने केलेल्या एअर स्ट्राईकची माहिती कळताच सोशल मीडियावर पाकिस्तानची खिल्ली उडवली जाऊ लागली. पाकिस्तान डिफेन्सच्या ट्विटची खिल्ली उडवत काही युजर्सनी काही अशा मजेशीर प्रतिक्रिया दिल्या. पाकिस्ताननेही भारतीय विमानांनी लाईन ऑफ कंट्रोल (LOC) पार केल्याचे मान्य केले आहे. (हेही वाचा, Surgical Strike 2 वर भारतीय लष्कराची प्रतिक्रिया, ट्विटर खास कविता)
दरम्यान, भारतीय लष्कराने विराज विमानांनी पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळावर हल्ला केला. हा हल्ला मंगळवारी पहाटे 3 वाजता करण्यात आला. सर्व विरोधी पक्षांना या हल्ल्याबाबत माहिती देण्यात आली. या हल्ल्यात एकूण किती दहशतवादी ठार झाले, याबाबत माहिती मिळू शकली नाही. मात्र, या हल्ल्यात सुमारे 200 ते 300 दहशतवादी ठार झाल्याचे सांगितले जात आहे. भारतीय लष्कराला फ्री हॅंड दिल्यामुलेच ही कारवाई होऊ शकली. ही कारवाई करताना भारतीय लष्कराचे कोणत्याही प्रकारे नुकसान झाले नाही.