Incarnation of Vishnu: मी विष्णुचा दहावा अवतार! पण तुम्हाला माझ्यात देव दिसणार नाही; गुजरातमधील Rameshchandra Fefar यांचा अजब दावा (Watch Video)
परंतू, मी भगवान विष्णूचा दहावा आवतार आहे. येणाऱ्या काही दिवसांमध्ये मी हे सिद्ध करुन दाखवेन. मी मार्च 2010 मध्ये ऑफिसमध्ये होतो तेव्हा मला जाणवले की, मी कल्कीचा आवतार आहे. तेव्हापासू माझ्याकडे दैवी शक्ती आहेत.
गुजरात सरकारच्या (Gujarat Government) सेवेत असलेल्या एका व्यक्तीने स्वत: भगवान विष्णुचा आवतार ( Incarnation of Vishnu) असल्याचा दावा केला आहे. रमेश चंद्र फेफर (Rameshchandra Fefar) असे या अधिकाऱ्याचे नाव आहे. या अधिकाऱ्याने म्हटले आहे की, मी भगवाण कल्की (Kalki) आणि विष्णु (Lord Vishnu) चा 10वा अवतार आहे. त्यामुळे ऑफिसला येऊ शकत नाही. 'विश्वाचे अंत:करण (Change the Global Conscience) बदल्यासाठी मी तपस्या (Penance)करत आहे.' या व्यक्तीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. वृत्तसंस्था एएनआयनेही या व्यक्तीचा व्हिडिओ आपल्या ट्विटह हँडलवर शेअर केला आहे. या व्हिडिओत हा व्यक्ती चित्रविचीत्र दावे करताना दिसतो. या व्यक्तीने योगगुरु म्हणून प्रसिद्ध असलेले रामदेवबाब हे सुद्धा देव असल्याचे म्हटले आहे.
प्रसारमाध्यमांनी दिलल्या वृत्तानुसार, रमेश चंद्र फेफर नामक व्यक्ती गुरजात राज्यातील सरदार सरोवर पुनर्वसन एजन्सी (Sardar Sarovar Punarvasvat Agency -SSPA) मध्ये अभियंता म्हणून कार्यरत आहे. रमेश चंद्र फेफर असे नाव असलेला हा व्यक्ती काही दिवसांपासून कामावर हजर नव्हता. त्यामुळे संबंधित विभागाकडून या व्यक्तीला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. यावर या व्यक्तीने नोटीसला उत्तर देताना म्हटले की, आपण भगवान विष्णूचा अवतार आहे. त्यामुळे ऑफिसला येऊ शकत नाही. सध्या आपण तपस्येत आहोत. आपल्या तपस्येमुळे देशात चांगला पाऊस होत आहे. फेफर यांनी कार्यालायला पाठवलेले उत्तर सोशल मीडियातूनही चांगलेच व्हायरल झाले आहे.
फेफर नावाच्या या व्यक्तीने राजकोट येथील आपल्या घरातून प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना म्हटले की, आपण विश्वास करणार नाही. परंतू, मी भगवान विष्णूचा दहावा आवतार आहे. येणाऱ्या काही दिवसांमध्ये मी हे सिद्ध करुन दाखवेन. मी मार्च 2010 मध्ये ऑफिसमध्ये होतो तेव्हा मला जाणवले की, मी कल्कीचा आवतार आहे. तेव्हापासू माझ्याकडे दैवी शक्ती आहेत.
एएसपीए (SSPA) ने रामेश चंद्र फेफार यांना दिन दिवसांपूर्वी नोटीस पाठवले होते. वय वर्षे 50 असलेल्या फेफर यांनी नोटीसला उत्तर देताना म्हटले की मी तपस्येत लीन आहे. मला वैश्विक अंत:करण बदलायचे आहे. त्यामुळे मी सध्या माझ्या घरात तपस्या करत आहे. मी ऑफिसमध्ये बसून तपस्या करु शकत नाही, असेही या अधिकाऱ्याने म्हटले आहे. विशेष म्हणजे रमेश चंद्र फेफर नोटीशीला दिलेल्या उत्तरात कार्यालयालाच प्रश्न विचारतात की, माझ्या तपस्येमुळे देशात पाऊस चांगला पडतो आहे. त्यामुळे मी ऑफिसमध्ये वेळ वाया घालवणे योग्य की घरी बसून तपस्या करणे. पुढे त्यांनी आपण कल्कीचा अवतार असल्याचेही म्हटले आहे. (हेही वाचा, भाजपचे 'वाघ' म्हणतात, 'पंतप्रधान मोदी विष्णूचा 11 वा अवतार')
एएनआय ट्विट व्हिडिओ
प्रसारमाध्यमांनी नोटीसच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, फेफार हे गेल्या आठ महिन्यांपासून वडोदरा येथील आपल्या ऑफिसमध्ये केवळ 16 दिवस गेले. नोटीसमध्ये म्हटले आहे की, गॅजेटेड ऑफिसरला अशा पद्धतीने अनधिकृत (unauthorised) पद्धतीने कामावर गैरहजर राहणे योग्य दसत नाही. आपल्या उनुपस्थितीमुळे कार्यालयीन कामात अडथळा निर्माण होत आहे. या नोटीशीलाच रमेश चंद्र फेफार महोदयांनी उत्तर दिले आहे .ज्यात चित्रविचीत्र दावे केले जात आहेत.