Valentine's Day: बिहारच्या दरभंगामध्ये Boyfriend On Rent चे पोस्टर हातात घेऊन रस्त्यावर उभा राहिला तरुण, सांगितले मजेशीर कारण; पाहा व्हिडिओ

यामध्ये एक मुलगा दरभंगा महाराजांच्या आवारात हातात पोस्टर घेऊन उभा असलेला दिसत आहे. या मुलाच्या हातातील पोस्टरवर 'बॉयफ्रेंड ऑन रेंट' (Boyfriend On Rent) असं लिहिले आहे.

Boyfriend On Rent चे पोस्टर घेऊन उभा असलेला मुलगा (PC - Twitter)

Valentine's Day: आज देशभरात व्हॅलेंटाईन डे (Valentine's Day) साजरा केला जात आहे. तरुण-तरुणी आजचा दिवस उत्साहात साजरा करत आहेत. प्रेमात पडलेल्यांसाठी हा दिवस खूप खास असतो. दरम्यान, सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक मुलगा पोस्टरच्या माध्यमातून अविवाहितांची व्यथा मांडत आहे. एवढंच नाही तर त्याने एकेरी प्रेम करण्यासोबतच इतरही अनेक समस्या मांडल्या आहेत. त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ बिहारमधील दरभंगा जिल्ह्यातील आहे. यामध्ये एक मुलगा दरभंगा महाराजांच्या आवारात हातात पोस्टर घेऊन उभा असलेला दिसत आहे. या मुलाच्या हातातील पोस्टरवर 'बॉयफ्रेंड ऑन रेंट' (Boyfriend On Rent) असं लिहिले आहे. हा मुलगा बराच वेळ रस्त्यावर पोस्टर घेऊन उभा आहे. दरम्यान, ये-जा करताना लोक त्याला पाहत आहेत. (वाचा - Telangana: सरकारी बसमध्ये प्रवास करण्यासाठी कंडक्टरने कोंबड्याचेही आकारले भाडे, पहा व्हिडिओ)

अशा प्रकारे रस्त्यावर हातात पोस्टर घेऊन उभे राहण्यामागे विशेष हेतू आहे. हा तरुण सांगतो की, व्हॅलेंटाईन वीकमध्ये लोकांमध्ये प्रेम वाटप करण्याचा माझा हेतू आहे. आजकाल बरेच लोक नैराश्य, निराशा आणि तणावाने ग्रस्त आहेत. सिंगल्ससाठी ही मोठी समस्या आहे. अविवाहित लोकांना प्रोत्साहन देण्याचा या पोस्टरमागचा हेतू होता. त्यांच्यातील निराशा दूर होऊ द्या.

याशिवाय जगात फक्त गर्लफ्रेंडचं नातं नसतं हे तरुणांना समजावून सांगण्याचाही उद्देश होता. आई-वडिलांसोबतही प्रेम करता येते. या ठिकाणी असा पवित्रा घेऊन का उभा राहिला, असे त्या मुलाला विचारले असता, या भागातील परिस्थिती चांगली नसल्याचे त्याने सांगितले. दरभंगा महाराजांचा हा वाडा ऐतिहासिक असून तो जीर्ण होत चालला आहे. हा प्रॉब्लेम दाखवण्याचाही माझा एक हेतू होता, असंही या तरुणाने सांगितलं आहे.