Hunting & Hunter Viral Video: चिमणीने घेतला बदला, शिकारी स्वत:शिकार झाला; लोक म्हणाले जागेवर न्याय झाला, पाहा व्हिडिओ

त्यांनी हा व्हिडिओ शेअर करत कॅप्शन लिहिली आहे 'कर्म'. या व्हिडिओत आपण पाहू शकता एक शिकारी आकाशात उडत्या पक्षाची शिकार करतो आहे.

Hunting | (Photo Credits: Twitter)

'जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर' हे गाणे सर्वश्रुत आहे. एका शिकाऱ्यालाही या गाण्याची प्रचिती आल्याचे एका व्हिडिओतून पुढे आले आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हायरल झालेल्या व्हिडिओतून ही बाब अधिक ठळकपणे पुढे आली. व्हिडिओत एक शिकारी एका पक्षाची शिकार करत होता. हा पक्षी नेमका कोणता होता याची पुष्टी होऊ शकली नाही. हा पक्षी बहुदा चिमणी असावा. शिकाऱ्याने पक्षाची शिकार केली परंतू, त्यानंतर जे घडले ते फारच जबरदस्त होते. या पक्षाने चक्क बदला घेतला. ज्यामुळे हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल (Hunting & Hunter Viral Video) होतो आहे.

हा व्हिडिओ इंडियन फॉरेस्ट सर्विस ऑफिसर सुसांत नंदा यांनी आपल्या ट्विटह हँडलवर शेअर केला आहे. त्यांनी हा व्हिडिओ शेअर करत कॅप्शन लिहिली आहे 'कर्म'. या व्हिडिओत आपण पाहू शकता एक शिकारी आकाशात उडत्या पक्षाची शिकार करतो आहे. बंदुकीची गोळी लागल्यामुळे पक्षी घायाळ झाला आहे. परंतू आकाशातून खाली येताना हा पक्षी येऊन थेट शिकाऱ्याच्या डोळ्यवरच धडकतो. (हेही वाचा, Tiger Fight Video: वाघाला भिडला वाघ, झुंज दोन वाघांची; डरकाळी सोबत नैसर्गिक संघर्षाची जबरदस्त झलक, पाहा व्हिडिओ)

ट्विटरवर शेअर झालेला हा व्हिडिओ आतापर्यंत 6 हजार लोकांनी पाहिला आहे. अनेकांनी हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. व्हिडिओखाली अनेक युजर्सनी मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका यूजर्सने म्हटले आहे की, शिकाऱ्याला कर्माचे फळ मिळाले. दुसऱ्याने म्हटले आहे की, निर्णय ऑन द स्पॉट, तर तिसऱ्याने म्हटले आहे निष्पाप पक्षाचा जीव घेताना लाज वाटत नाही का?



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif