Human Baby Size Frog Viral Video: Solomon Islands मध्ये गावकर्यांना आढळला मनुष्याच्या बाळाच्या आकाराइतका मोठा बेडूक (Watch Video)
जेव्हा Solomon islands वर काही गावकर्यांनी त्याला पाहिलं तेव्हा ते अचंबित झाले होते.
जगात Cornufer Guppyi हा सर्वात मोठ्या आकाराचा बेडूक म्हणून ओळखला जातो. Honiara च्या भागात काही गावकर्यांना या बेडकाचं दर्शन झालं आहे. आश्चर्याची बाब म्हणजे हा बेडूक साधरण मानुष्याच्या बाळाच्या आकारा इतका मोठा आहे. मीडीया रिपोर्ट्सनुसार, जेव्हा Solomon islands वर काही गावकर्यांनी त्याला पाहिलं तेव्हा ते अचंबित झाले होते.
Honiara मध्ये Jimmy Hugo ला हा महाकाय बेडूक डुक्करांची शिकार करताना दिसला. त्याचं सारं गाव या बेडकाला पाहून थक्क झाले आहे. गावकर्यांनी जेव्हा हा बेडूक बघितला तेव्हा त्यांच्याआश्चर्यचकित झाल्याच्या प्रतिक्रिया देखील सध्या सोशल मीडीयामध्ये एक व्हिडिओ वायरल झाला आहे. ( नक्की वाचा: 6 फूटी Monitor Lizard जेव्हा Thailand च्या 7-Eleven स्टोअर मध्ये वस्तूंवरून झपझप चढते; सोशल मीडीयात झपाट्याने वायरल होतोय हा स्तब्ध करणारा व्हिडीओ - watch Video).
Jimmy ने Daily Mail ला दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये त्याने जेव्हा पहिलांदा हा बेडूक बघितला तेव्हा त्याचा यावर विश्वासच बसत नव्हता. गावात अनेकजण याला 'बुश चिकन' म्हणत होते. त्याला पकडणं देखील कठीण होते. गवतामध्ये खेळणार्या काही कुत्र्यांनी या बेडकाला पकडलं. तेव्हा नेमका बेडकांचा फोटो क्लिक करणं शक्य झालं. दरम्यान या बेडकाचा मृत्यू झाला होता त्यामुळे आम्ही देखील त्याच्यावर ताव मारला आहे. पुन्हा आम्हांला अशाप्रकारे बेडूक दिसला तर आम्ही त्याला पकडू आणि जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करू असं म्हटलं आहे.
Cornufer Guppyi हा Ceratobatrachidae गटातील आहे. सध्या त्यांची संख्या कमी होत चालली आहे. त्यांची त्वचा अ तिशय संवेदनशील असल्याने वाढत्या प्रदुषणामध्ये त्यांच्या संख्येत घट होत आहे.