Hugh Hefner's Sex Tool: 'प्लेबॉय' मासिकाचे संस्थापक ह्यू हेफनर यांच्या एक्स-गर्लफ्रेंडने उघड केले त्यांचे महत्वाचे सेक्स टूल; गुप्तांगावर लावायचे 'ही' गोष्ट
'प्लेबॉय मॅन्शन'मधील मुली लवकरात लवकर ह्यू हेफनरसोबतची सेक्सची प्रक्रिया संपवण्याचा प्रयत्न करायच्या. ह्यू याचे प्लेबॉय मॅन्शन एकेकाळी खूप वादग्रस्त होते
'प्लेबॉय' (Playboy) मासिकाचे संस्थापक ह्यू हेफनर (Hugh Hefner) हे अमेरिकन मनोरंजन उद्योगात विशेषत: फॅशन आणि मॉडेलिंगच्या जगात मोठे नाव आहे. 2017 मध्ये वयाच्या 91 व्या वर्षी निधन झाल्यानंतरही त्यांचा महाल, प्लेबॉय मॅन्शनमधील कथा चर्चेचा विषय बनल्या आहेत. ह्यू हेफनर हे पहिल्यापासून महिलांमध्ये विशेष लोकप्रिय होते. म्हातारे झाल्यानंतरही अनेक मुलींसोबतचे त्यांचे अफेअर आणि विलासच्या चर्चा कमी झाल्या नाहीत. मृत्यूच्या 5 वर्षांपूर्वी त्यांनी तिसरे लग्न केले होते. आता त्यांच्याबाबत एका नवा खुलासा झाला आहे.
ह्यू हेफनरसोबत वेळ घालवलेल्या दोन महिलांनी ह्यू यांनी सेक्ससाठी 'बेबी ऑइल'चा वापर केल्याचे सांगितले आहे. 44 वर्षीय होली मॅडिसन आणि 48 वर्षीय ब्रिजेट मर्कार्डट यांनी ही माहिती उघड केली आहे. बेबी ऑईलचा Lubricants म्हणून वापर केल्याने संसर्ग होण्याचा धोका अधिक असतो. 2000 च्या दशकाच्या सुरुवातीला ह्यू हेफनरच्या तीन प्रमुख मैत्रिणींमध्ये या दोघी होत्या.
त्यांच्या माजी गर्लफ्रेंड्सनी सांगितले की, सेक्सदरम्यान, ह्यू हेफनर त्यांच्या गुप्तांगांवर लहान मुलांच्या तेलाचा वापर करायचे, यामागचे कारण समजण्यापलीकडले आहे. हे खूपच घृणास्पद आहे. महिलांनी पुढे सांगितले की, सेक्सदरम्यान वंगण म्हणून तेलाचा वापर करणे हे योग्य नाही. यामुळे महिलांना संसर्ग होण्याचा धोका असतो. यासाठी त्यांना डॉक्टरांचा सल्लाही घ्यावा लागला होता. अशा प्रकारच्या तेलाचा वापर महिलांच्या मर्जीविरुद्ध व्हायचा. (हेही वाचा: शारीरिक सुख नव्हे तर शांततेच्या शोधात सौदी अरेबियातील व्यक्तीने 43 वर्षात केले 53 वेळा लग्न)
आणखी एका महिलेने नोंदवले की, तरुणी ह्यू हेफनरला बेडरूममध्ये 'डॅडी' म्हणून संबोधायच्या. 'प्लेबॉय मॅन्शन'मधील मुली लवकरात लवकर ह्यू हेफनरसोबतची सेक्सची प्रक्रिया संपवण्याचा प्रयत्न करायच्या. ह्यू याचे प्लेबॉय मॅन्शन एकेकाळी खूप वादग्रस्त होते. या बंगल्यात हजारो मुलींसोबत हेफनर एकटाच राहत होता. दरम्यान, ह्यू हेफनरने 1953 मध्ये प्लेबॉयची स्थापना केली. अगदी कमी कालावधीमध्ये ते जगातील सर्वाधिक विकले जाणारे प्रौढ मासिक बनले. एकदा त्याच्या एकाच महिन्यात सात दशलक्ष प्रती विकल्या गेल्या. मात्र, 2017 मध्ये हेफनरच्या मृत्यूनंतर कंपनीने मासिकाची छपाई बंद केली.