Buying Remdesivir? फेक रेमडेसिवीर कसे ओळखाल? IPS अधिकारी मोनिका भारद्वाज यांनी सांगितल्या टिप्स
त्यामुळे खरेदी करत असलेले रेमडेसिवीर इंजेक्शन ओरिजनल आहे की नाही? हा सवाल उत्पन्न होणे अत्यंत स्वाभाविक आहे.
देशातील कोरोना व्हायरस (Coronavirus) संसर्गात झपाट्याने झालेल्या वाढीमुळे रेमडेसिवीर (Remdesivir) इंजेक्शनची मागणी वाढली आहे. यामुळे इंजेक्शनच्या काळाबाजाराच्या अनेक घटना सातत्याने समोर येत आहेत. फेक रेमडेसिवीर विकत असल्याच्या देखील काही घटना उघडकीस आल्या आहेत. कोरोनाचे संकट (Corona Crisis), रेमडेसिवीरचा तुडवटा आणि फेक इंजेक्शनची विक्री यामुळे लोकांपुढील समस्या अधिक वाढल्या आहेत. त्यामुळे खरेदी करत असलेले रेमडेसिवीर इंजेक्शन ओरिजनल आहे की नाही? हा सवाल उत्पन्न होणे अत्यंत स्वाभाविक आहे. दिल्ली पोलिस क्राईम ब्रॉंचच्या डिसीपी आयपीएस ऑफिसर मोनिका भारद्वाज (IPS Officer Monika Bhardwaj) यांनी फेक इंजेक्शन ओळखण्याच्या काही ट्रिक्स शेअर केल्या आहेत.
मोनिका भारद्वाज यांनी ट्विटरवर एक फोटो शेअर करत फेक आणि ओरिजनल रेमडेसिवीर इंजेक्शन कसे ओळखाल याच्या सोप्या ट्रिक्स सांगितल्या आहेत. रेमडेसिवीर इंजेक्शच्या पॅकेटवरुन तु्ही फेक आणि ओरिजनल रेमडेसिवीरमधील फरक ओळखू शकाल. (Remdesivir Injection Black Marketing: मुंबईत कांदिवली परिसरात पॅरामेडिकल विद्यार्थ्यांसह MR ला रेमेडेसीवीरचा काळाबाजार केल्याप्रकरणी अटक)
पहा ट्विट्स:
फेक किंवा ओरिजनल रेमडेसिवीर इंजेक्शन कसे ओळखाल?
# रेमेडिसवीरचे पॅकेट पाहिल्यास बनावट रेमडेसिवीर इंजेक्शनच्या नावाच्या आधी 'Rx' लिहिलेले नाही.
# या पॅकेटची तिसरी ओळ पाहिल्यास मूळ इंजेक्शनच्या पॅकेटवर ‘100 mg/Vial’ लिहिलेले असते. तर बनावट पॅकेटवर ‘100 mg/vial’लिहिलेले असते. या कॅपिटलायझेशनच्या चुकीमुळे तुम्हाला ओरिजनल आणि बनावट इंजेक्शनमधील फरक कळू शकेल.
# रेमेडिसवीर इंजेक्शनच्या प्रॉडक्ट ब्रँड नावातही एक चूक आहे. बनावट आणि अस्सल इंजेक्शन पॅकेटमधील अंतर पाहून आपण सहजपणे ओळखू शकता.
# फेक रेमडेसिवीर इंजेक्शनच्या पॅकेटवर एक कॅपिटलिझेशनची चूक दिसून येते. मूळ पॅकेटवर ‘For use in’ असे लिहिलेले असते तर फेक पॅकेटवर ‘for use in’असे लिहिलेले असते.
# मूळ रेमडेसवीर इंजेक्शन पॅकेटच्या मागील बाजूस वॉर्निंग लाल रंगात लिहिलेली असते तर बनावट पॅकेटवर ते काळ्या रंगात लिहिलेले दिसते.
# बनावट रेमडेसिवीर इंजेक्शन पॅकेटवर दिलेल्या पत्त्यामध्ये स्पेलिंगच्या चुका आहेत. उदा. Telangana जागी Telagana असे लिहिलेले दिसते.
या टिप्समुळे तुम्हाला अस्सल आणि बनावट रेमडेसिवीर इंजेक्शन ओळखणे सहज शक्य होईल.