कोरोना व्हायरसपासून बचाव करण्यासाठी हॉलिवूड पॉप स्टार माईली सायरस हिने स्वत:ला वॉशीन मशीनमध्ये घेतले कोंडून; पाहा संपूर्ण व्हिडिओ

तर, 1 लाख 70 हजारांहून अधिक लोकांना याची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. कोरोना व्हायरसमुळे मृतांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असल्यामुळे सर्वत्र भितीजनक वातावरण निर्माण झाले आहे.

कोरोना व्हायरसने (Coronavirus) संपूर्ण जगात थैमान घातला असून आतापर्यंत जवळपास 7 हजाराच्या लोकांचा मृत्यू झाला आहे. तर, 1 लाख 70 हजारांहून अधिक लोकांना याची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. कोरोना व्हायरसमुळे मृतांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असल्यामुळे सर्वत्र भितीजनक वातावरण निर्माण झाले आहे. कोरोनाच्या भितीने अनेकांनी घराबाहेर पडणेही टाळले आहे. यातच अमेरिकेची प्रसिद्ध गायिका माईली सायरसने (Miley Ray Cyrus) कोरोनाच्या धास्तीने स्वताला चक्क वॉशीन मशीनमध्ये कोंडून घेतल्याचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. कोरोना व्हायरसमुळे हॉलिवूड प्रचंड हादरले आहे. कोरोना व्हायरसेने हजारोंचे बळी घेतले आहेत. तर, लाखोपेक्षा अधिक लाके ग्रासले आहेत. सामन्यांपासून ते सेलिब्रिटीपर्यंत कुणीही यातून सुटलेले नाही.

नुकताच मायलीने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकांना धक्का लागला आहे. कोरोनामुळे सर्वत्र भिती पसरत आहे. याच धास्तीने मायलीने कोरोनापासून बचाव करण्यासाठी एक आगळी वेगळी शक्कल लढवली आहे. या व्हिडिओत ती वॉशिंग मशीनच्या आत बसलेली दिसत आहे. सुरुवातीला या व्हिडिओत वॉशिंग मशीन दिसत आहे. परंतु, वॉशिन मशीनचा दरवाजा उघडल्यानंतर पांढरे ब्लॅंकेट अंगभोवती गुंडाळून आत बसलेली पाहायला मिळत आहे. दरम्यान, तिच्या चेहऱ्यावर कोरोनाची भिती स्पष्टपणे दिसत आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रदुर्भावामुळे वॉशिंग मशीनमध्ये जागा नसताना मायली तेवढ्या जागेतही जाऊन बसली आहे. हे देखील वाचा- Coronavirus Outbreak: नागपूरमध्ये महाराष्ट्र पोलिसांनी दारू पिऊन गाडी चालवणाऱ्यांची Breath-Analyser तपासणी थांबवली

इन्स्टाग्राम पोस्ट-

 

View this post on Instagram

 

LOL! #MileyCyrus gets locked up in her washing machine, thanks to #coronavirusoutbreak

A post shared by It's TV Time (@shiningbollywood) on

याआधी चीनमध्ये विमातून प्रवास करत असताना एका तरूणाने स्वताला प्लास्टिकच्या पिशवीमध्ये गुंडाळून घेतल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. विमानात प्रवास करणाऱ्या दुसऱ्या व्यक्तीने संबंधित व्यक्तिचा व्हिडिओ शूट करून ट्वीटरवर शेअर केला होता. त्या व्हिडिओवर अनेकांनी आपली प्रतिक्रिया नोंदवल्या होत्या.