Happy Birthday Jyoti Amge: जगातील सर्वात बुटकी महिला अशी नोंद असणार्या नागपूरच्या ज्योतीच्या आयुष्यातील 'या' गोष्टी 'ध्येयवेड्यां'साठी ठरू शकतात प्रेरणा
ज्योतीचा जन्म 16 डिसेंबर 1993 रोजी किशन आणि रंजना अमगे या दांमप्त्याच्या पोटी झाला. गिनिज वर्ल्ड रेकॉर्ड्स नुसार तिचं वजन 11 पाऊंड तर उंची 23 इंच, 2 फूट, 6 इंच इतकी आहे.
ज्योति आमगे (Jyoti Amge), ही गिनीज बूक ऑफ रेकॉर्ड्सच्या नोंदीनुसार जगातील सर्वात बुटकी जिवंत महिला असल्याने ती अनेकांना परिचित आहे. आज (16 डिसेंबर) ज्योतीचा 27 वा वाढवदिवस आहे. एका जेनिटिक डिसऑर्डरमुळे ज्योतीच्या उंचीची वाढ खुंटली आहे पण तिच्या आकांक्षा पुढती गगन ठेंगणे आहे. दुर्दम्य इच्छाशक्तीचं जीवंत उदाहरण म्हणजे ज्योती आहे. ती केवळ गिनीज बूक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये तिची नोंद असल्याने प्रसिद्ध नाही तर तिच्या स्किल्स आणि हजरजबाबी व्यक्तिमत्त्वामुळे देखील तिची अनेकदा चर्चा होते. ज्योती अत्यंत हुशार आहे. अनेकदा तिने अभिनय क्षेत्रामध्ये काम करण्याची तिची इच्छा बोलून दाखवली आहे. मग आज तिच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊ तिच्या व्यक्तिमत्त्वातील आणि आयुष्यातील खास गोष्टी! (नक्की वाचा: नागपूर: जगातील सर्वात बुटकी महिला ज्योति आम्गे कोरोना व्हायरस बाबत जनजागृतीसाठी पोलिसांच्या मदतील!)
- ज्योतीचा जन्म 16 डिसेंबर 1993 रोजी किशन आणि रंजना अमगे या दांमप्त्याच्या पोटी झाला. गिनिज वर्ल्ड रेकॉर्ड्स नुसार तिचं वजन 11 पाऊंड तर उंची 23 इंच, 2 फूट, 6 इंच इतकी आहे.
- ज्योतीची उंची खुंटण्यामागील कारण म्हणजे achondroplasia ही जेनिटीक डिसऑर्डर. ती 5 वर्षाची असताना आमगे कुटुंबाला तिला ही डिसऑर्डर असल्याचं समजलं.
- achondroplasia असणार्यांमध्ये पुरूषांची सरासरी उंची 52 इंच तर महिलेची सरासरी उंची 42 इंच असते. त्यामुळेच ज्योतीची केस ही 'युनिक' आहे.
- ज्योतीच्या 18 व्या वर्षी गिनीज बूक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्सने तिला जगातील सर्वात बुटकी महिला म्हणून नोंद केले.
- नागपूरमध्येच ज्योतीचं शिक्षण झालं शाळेत तिच्यासाठी खास डेस्क आणि खूर्ची होती. तर तिचे कपडेही कस्टमाईज्ड बनवले जातात.
- जगातील सर्वात बुटकी महिला अशी तिची नोंद झाल्यानंतर तिला अभिनय क्षेत्रामध्ये काम करण्याच्या अनेक संधी मिळाल्या. अनेक भारतीय टेलिव्हिजन शो मध्ये तिनं काम केलं आहे.
- एका रिपोर्ट नुसार ज्योतीला हॉलिवूड खुणावत आहे आणि तिला तेथे अभिनेत्री व्हायचं आहे. पुढे हे स्वप्न अस्तित्त्वातही आलं. 8 ऑक्टोबर 2014 ला प्रिमिअर झालेल्या ‘American Horror Story: Freak Show,” मध्ये ती झळकली.
- 2012 साली ‘Lo show dei Record’ यामध्ये ती एका इटालियन प्रेझेंटर सोबत को होस्ट होती.
- 2009 साली युकेच्या ‘Body Shock: Two Foot High Teen,” या डॉक्युमेंटरी मध्ये ती झळकली होती.
अनेकांना ज्योतीच्या आयुष्याबद्दल ठाऊक नसलेल्या गोष्टींबद्दालच्या यादीमधील या केवळ काही मोजक्या गोष्टी आहेत. पण ज्योतीचं आयुष्य आणि त्याकडे तिचा बघण्याचा दृष्टीकोन हा अनेकांसाठी प्रेरणादायी आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)