Bride Groom Viral Video: वधूला पाहून नवरदेव डोक्यावर उभा राहिला; Pre Wedding Shoot पाहून लोकांनी लावला डोक्याला हात
तुम्ही अनेक प्रकारचे प्री वेडिंग शूट पाहिले असतील पण तुम्ही असे प्री वेडिंग शूट क्वचितच पाहिले असतील. ज्यामध्ये वर हेडस्टँड आणि वधू भरतनाट्यम करताना दिसत आहे. डोक्यावर उभा असलेल्या वराला पाहून अनेकांनी डोक्याला हात लावला आहे.
Bride Groom Viral Video: लोकांना लग्नाशी संबंधित व्हिडिओ पाहायला आवडतात. काही व्हिडिओ लग्नाच्या विधींचे असतात, तर काही बारात्यांच्या अप्रतिम नृत्यांचे असतात. पण हा व्हिडिओ जरा वेगळा आहे. हा व्हिडिओ पाहून असे दिसते की, वधू-वर त्यांचे प्री वेडिंग शूट करत आहेत. तुम्ही अनेक प्रकारचे प्री वेडिंग शूट पाहिले असतील पण तुम्ही असे प्री वेडिंग शूट (Pre Wedding Shoot) क्वचितच पाहिले असतील. ज्यामध्ये वर हेडस्टँड आणि वधू भरतनाट्यम करताना दिसत आहे. डोक्यावर उभा असलेल्या वराला पाहून अनेकांनी डोक्याला हात लावला आहे.
या जोडप्याने लग्नाचा पारंपरिक पोशाख परिधान केला आहे. यापूर्वी अशा प्रकारचे प्री वेडिंग शूट तुम्ही कधीही पाहिले नसेल. लग्नाआधी प्री वेडिंग शूट करणं हे जवळपास प्रत्येक वधू-वराचं स्वप्न असतं. पण इतके अवघड शूट करण्यात क्वचितच कोणाला रस असेल. (हेही वाचा - Viral Video: कुंपणचं शेत खातयं! रेल्वे स्थानकांवरील अधिकृत विक्रेत्यांकडून प्रवाशांची मोठी फसणूक, पहा व्हिडीओ)
Pre wedding shoot कठिन होता जा रहा है, अच्छा हुआ अपन पहले ही निपट गये😃 pic.twitter.com/kzEKHtKi7H
— Hasna Zaroori Hai (@HasnaZarooriHai) November 4, 2022
हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे. आतापर्यंत हा व्हिडिओ लाखो वेळा पाहिला गेला आहे. एवढेच नाही तर हजारो लोकांनी व्हिडिओला लाइकही केले आहे. अवघ्या 38 सेकंदांचा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोक कमेंट सेक्शनमध्ये मजेशीर प्रतिक्रिया देताना दिसत आहेत.
(The above story first appeared on LatestLY on Nov 07, 2022 05:11 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

