Google Year in Search 2020: आयपीएल, UEFA Champions League, फ्रेंच ओपनसह यंदा भारतात गूगलवर 'या' खेळ स्पर्धांची रंगली चर्चा

इंडियन प्रीमियर लीगने (आयपीएल) वर्षभरात अव्वल ट्रेंडिंग क्वेरीसाठी कोरोना व्हायरसलाही मागे टाकले, अशी माहिती गुगल इंडियाच्या Year In Search 2020' जाहीर करण्यात आली. त्यामागे यूईएफए चॅम्पियन्स लीग, प्रीमियर लीग, फ्रेंच ओपन, ला लीगा, Serie A, ऑस्ट्रेलियन ओपन, एनबीए, अशा प्रसिद्ध स्पर्धांनी भारतात सर्वाधिक शोधल्या गेलेल्या पहिल्या 10 क्रीडा स्पर्धेत स्थान मिळवले आहे.

मुंबई इंडियन्स आयपीएल 2020 (Photo Credit: PTI)

Google Year in Search 2020: भारताला क्रिकेट आवडते आणि हे पुन्हा सिद्ध झाले आहे. इंडियन प्रीमियर लीगने (Indian Premier League) वर्षभरात अव्वल ट्रेंडिंग क्वेरीसाठी कोरोना व्हायरसलाही मागे टाकले, अशी माहिती गुगल इंडियाच्या 'Year In Search 2020' जाहीर करण्यात आली. गेल्या वर्षी गुगल सर्चवरील टॉप ट्रेंडिंग (Google Search Top Query) क्वेरी ही 'आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कप 2019' 'होती आणि पुन्हा एकदा क्रिकेट स्पर्धेने गुगल इंडियाच्या वर्षाच्या शोधात पुन्हा अव्वल स्थान मिळवले आहे. स्पोर्टिंग आणि न्यूज इव्हेंटमध्ये सर्वात जास्त शोधण्यात येणार्यात क्वेरीमध्ये आयपीएल (IPL) नंतर कोरोना व्हायरस, अमेरिकन निवडणुकीचा निकाल (US Election Results), पंतप्रधान किसान योजना, बिहार निवडणुकीचा निकाल आणि दिल्लीतील निवडणुकीचा निकाल असे गूगलवर चर्चेचा विषय बनले. कोविड-19 च्या उद्रेकामुळे भारताऐवजी (India) युएई येथे आयोजित करण्यात आलेल्या आयपीएलच्या मागील आवृत्तीच्या तुलनेत 13व्या आवृत्तीत दर्शकांची संख्या विक्रमी 28 टक्क्यांनी वाढल्याचे समोर आले. (Top Tweets of 2020: सुशांत सिंह राजपूत, अमिताभ बच्चन पासून चैडविक बोसमैन पर्यंत 'हे' होते सर्वाधिक चर्चेत राहिलेले ट्विट्स)

भारतात आयपीएल 2020 यंदा सर्वाधिक सर्च केले जाणारी खेळ स्पर्धा ठरली असून त्यामागे यूईएफए चॅम्पियन्स लीग, प्रीमियर लीग, फ्रेंच ओपन, ला लीगा, Serie A, ऑस्ट्रेलियन ओपन, एनबीए, युरोपा लीग आणि यूईएफए नेशन्स लीग या स्पर्धांनी भारतात सर्वाधिक शोधल्या गेलेल्या पहिल्या 10 क्रीडा स्पर्धेत स्थान मिळवले आहे. दरम्यान, सन 2020 मध्ये भारतातील अव्वल 10 शोध घेतलेल्या व्यक्तिमत्त्वात एकमेव क्रीडा व्यक्तिमत्त्व म्हणजे अफगाणिस्तानचा क्रिकेटर राशिद खान आहे.

गुगलने प्रसिद्धीपत्रकात म्हटले की भारतीय यूजर्सने वर्षभरात सर्च इंजिनवर अनोखी माहिती शोधात असल्याचे जाणवून दिले. 2020 मध्ये कोरोना व्हायरस भारतात सर्वाधिक सर्च होणार न्यूज इव्हेंट होता. कोरोना व्हायरसचा उद्रेक 2020 सर्वात मोठी घटना होती ज्याने जवळजवळ प्रत्येक मानवी जीवनावर परिणाम केला, तर अमेरिकेची अध्यक्षीय निवडणूक ही आणखी एक घटना होती जी महत्त्वाची होती तर बिहार आणि दिल्लीतील विधानसभा निवडणुका देखील भारतीयांसाठी सर्वाधिक शोधल्या जाणार्‍या घटनांपैकी एक होत्या.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now