महिलांच्या समोर करायचा हस्तमैथून, पोलिसांनी Google Map वरुन शोध काढून केली अटक
ऑस्ट्रेलिया येथील क्विन्सलँड मधील पोलिसांनी गुगल मॅप (Google Map) च्या सहाय्याने महिलांच्या समोर हस्तमैथून करणाऱ्या आरोपीला अटक केली आहे.
ऑस्ट्रेलिया येथील क्विन्सलँड मधील पोलिसांनी गुगल मॅप (Google Map) च्या सहाय्याने महिलांच्या समोर हस्तमैथून करणाऱ्या आरोपीला अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिलेने दाखल केलेल्या तक्रारीनंतर या आरोपीला पकडण्यात आले आहे. परंतु आरोपी मानसिक दृष्ट्या आजारी असल्याचे समोर आले आहे. तर अधिकाऱ्यांच्या मते या व्यक्तीने समाजातील लोकांना अश्लील चाळे करुन दाखवत त्रास दिला आहे. या प्रकरणी तपास करत असलेल्या अधिकाऱ्यांनी 43 व्यक्तीला गुगल मॅपच्या सहाय्याने अटक केली आहे. येत्या 11 फेब्रुवारी रोजी आरोपीला ब्रिसबेन येथील न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
News.co.au च्या अनुसार, आरोपीने 2015-2019 या वर्षात महिलांना त्याच्या अश्लील कृत्याने त्रास दिला होता. तर गेली च4 वर्षे हा विकृत व्यक्ती एका विशेष रस्त्यांवरुन भटकत असे. त्याला जुलै 2017 मध्ये गुगल स्ट्रीट व्यू कार द्वारे कैद केले होते. त्यानंतर या व्यक्तीचे चित्र रेखाटून त्याच्या चेहऱ्याशी मिळते जुळते केले होते. त्यावेळी चित्रातील आरोपीची खरी ओळख समोर आली.
पोलिसांकडून या प्रकरणी अधिक तपास केले जात आहे. तर आरोपीविरुद्ध आणखी पुरावा मिळतो आहे का याचा तपास करत आहे.