डॉ. हर्बर्ट क्लीबर यांचे स्मरण: 'व्यसनमुक्ती' साठी अनेकांना मदत करणारे अमेरिकन सायकोलॉजिस्ट Dr. Herbert Kleber यांच्या कार्याचा सन्मान करणारे खास Google Doodle
Institute of Medicine of the National Academy of Science यामध्ये 1 ऑक्टोबर 1996 साली त्यांची निवड करण्यात आली. त्याच्या 23 व्या वर्षपूर्तीनिमित्त खास गूगल डुडल
Herbert David Kleber Google Doodle: गूगलने आज गूगल डुडलच्या माध्यमातून Dr Herbert David Kleber या मनोविकारतज्ञ आणि नशेच्या गर्तेत अडकलेल्यांची सुटका करण्यासाठी विशेष योगदान दिले आहे. आज National Academy of Medicine मध्ये त्यांच्या निवडीला 23 वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्त गूगल डुडलच्या माध्यमातून खास गौरव करण्यात आला आहे. अमेरिकेत मानाच्या समजल्या जाणार्या संस्थांपैकी एक म्हणजे Institute of Medicine of the National Academy of Science यामध्ये 1 ऑक्टोबर 1996 साली त्यांची निवड करण्यात आली. मागील वर्षी डॉ. क्लेबर यांचे निधन झाले आहे. आजचं गूगल डुडल वैशिष्ट्यपूर्ण आहे. यामध्ये रूग्ण आणि डॉक्टर एकमेकांशी चर्चा करत आहे. यामध्ये हळूहळू रूग्ण नशेच्या गर्तेमधून बाहेर पडत आहे असे दाखवण्यात आले आहे. मैसाचुसेट येथील जॅरेट जे क्रोसोज्का यांनी हे गूगल डुडल साकारले आहे.
अमेरिकेमध्ये पिस्टाबर्ग येथे जून 19, 1934 साली त्यांचा जन्म झाला. त्यानंतर अमेरिकेमध्ये त्यांनी सायलॉजी विषयामध्ये शिक्षण घेतले. डॉ. हर्बट क्लेबर यांनी येल युनिव्हर्सिटीमध्ये डृग डिपेंडंस युनिटची स्थापना केली. या विभागाचे ते प्रमुख आणि सायकोलॉजी विषयाचे प्राध्यापक होते. त्यानंतर व्हाईट्स हाऊसमध्येही त्यांनी विशेष काम केले. डॉ. क्लेबर हे नॅशनल डृग कंट्रोल पॉलिसी कार्यालयामध्ये डिमांड रिडक्शनचे डेप्युटी डायरेक्टर म्हणून अडीच वर्ष कार्यरत होते. नशेच्या आहारी गेलेल्यांकडे समाज एका विशिष्ट नजरेने पाहत असे. मात्र त्यांच्यावर वैद्यकीय उपचार आणि थेरेपीच्या मदतीने अनेकांची व्यसनातून मुक्तता करण्याच्या कार्यामध्ये डॉ. क्लेबर यांचे विशेष योग्दान आहे. हान्स ख्रिश्चन ग्रॅम यांचा 166 वा स्मृतिदिन: Hans Christian Gram या मायक्रोलॉजिस्टच्या 'Gram Stain' ला सलामी देणारे खास Google Doodle
डॉ.क्लेबर हे अमेरिकेमधील नामांकित सायकोलॉजिस्टपैकी एक होते. त्यांचा अनेक पुरस्कारांनी गौरव करण्यात आला आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)