Marie Tharp Google Doodle: मेरी थार्प यांच्या स्मरणार्थ गूगलच्या होमपेजवर झळकलं अॅनिमेटेड गूगल डूडल
त्यानंतर Geography and Map Division, the Library of Congress च्या 100 व्या वर्षपूर्तीला थार्प यांचा गौरव 20व्या शतकामधील Most Important Cartographers म्हणून करण्यात आला.
गूगल (Google) कडून आज (21 नोव्हेंबर) होमपेज वर मेरी थार्प (Marie Tharp) यांच्या स्मरणार्थ खास गूगल डूडल (Google Doodle) साकारण्यात आले आहे. Marie Tharp या अमेरिकन भूवैज्ञानिक आणि Oceanographic Cartographer होत्या. महाद्वीपीय प्रवाहाचे सिद्धांत सिद्ध (Theories of Continental Drift) करण्यामध्ये त्यांचा मोलाचा वाटा होता. गूगलच्या होमपेजवर आज मेरी थार्प यांच्या स्मरणार्थ होमपेजवरही व्हिडिओ स्वरूपात अॅनिमेटेड रूपात डूडल आहे. Marie Tharp कडून पहिल्यांदा ओशन फ्लोअरचा वर्ल्ड मॅप जारी करण्यात आला होता.
Marie Tharp यांना 20 व्या शतकामधील मानाच्या cartographers म्हणून 21 नोव्हेंबर 1998 साली नावाजण्यात आले. त्यांचा जन्म 19 जुलै 1920 साली झाला आहे. अमेरिकेच्या Michigan शहरातील Ypsilanti मध्ये त्यांचा जन्म झाला.
आजच्या गूगल डूडल मधील नरेटिव्ह Caitlyn Larsen, Rebecca Nesel, आणि Dr. Tiara Moore यांच्या आवजातील आहे. या तिन्ही महिला आज पुरूषांचं वर्चस्व असलेल्या ocean science आणि geology spaces मध्ये काम करत थार्प यांचा वसा पुढे चालवत आहेत. नक्की वाचा: FIFA World CUP 2022 Google Doodle: फिफा विश्वचषक 2022- उद्घाटनाचा दिवस गूगल डूडल, जगभरात फुटबॉल फिवर.
थार्प यांनी आपलं सारं मॅप कलेक्शन Library of Congress ला 1995 साली दिलं. त्यानंतर Geography and Map Division, the Library of Congress च्या 100 व्या वर्षपूर्तीला थार्प यांचा गौरव 20व्या शतकामधील Most Important Cartographers म्हणून करण्यात आला.cartography क्षेत्रामध्ये काम करणारी मेरी थार्प ही एकमेव महिला काम करत असल्याने तिच्या संशोधनांना Heezen कडून “girl talk” म्हणून संबोधण्यात आले होते. मेरी थार्प यांनी ओशन फ्लोअरचा मॅप बनवण्यासोबतच Mid-Atlantic Ridge यांचे देखील संशोधन केले आहे.