#GoodBy2018: सन 2018 मध्ये सोशल मीडियावर टॉप ट्रेंड ठरलेले हॅशटॅग
तसेच इतरही सोशल मीडियातून या विषयांची जोरदार चर्चा रंगली. दरम्यान, 20108मध्ये भारतात सर्वाधिक कोणते टॅग चर्चिले गेले याची साधारण यादी इथे देत आहोत. घ्या जाणून....
सन 2018 हे वर्ष नेटीझन्ससाठी अत्यंत महत्त्वाचे ठरले. या वर्षात विविध क्षेत्रात अनेक घडामोडी घडल्या. त्याचे पडसाद इंटरनेट आणि सोशल मीडियावरही उमटले. ज्याचे एकत्रित प्रतिबिंब हॅशटॅगच्या रुपात परावर्तित झाल्याचे पाहायला मिळाले. १ जानेवारी ते १० नोव्हेंबपर्यंतच्या ट्वीट्सच्या विश्लेषणातून ट्विटरने एक अहवाल नुकताच जाहीर केला. या अहवालात पुढे आले की, या वर्षी राजकारण, मनोरंजन, क्रीडा, संगीत, सामाजिक मोहिमा या गोष्टींवर सर्वाधिक ट्विट करण्यात आले. तसेच इतरही सोशल मीडियातून या विषयांची जोरदार चर्चा रंगली. दरम्यान, 20108मध्ये भारतात सर्वाधिक कोणते टॅग चर्चिले गेले याची साधारण यादी इथे देत आहोत. घ्या जाणून....
२०१८ मधील सर्वाधिक चर्चित हॅशटॅग
#MeToo- मॉडेलिंग, चित्रपट इंडस्ट्री आणि त्यानंतर विविध क्षेत्रात महिलांच्या होणाऱ्या लैंगिक शोषणाविरुद्ध उठवणारी ही मोहीम. प्रामुख्याने ही मोहीम सुरु झाली विदेशात. पण, अल्पावधीतच या मोहिमेने भारतातही चांगलेच मूळ धरले. सध्यास्थितीत ही मोहीम काहीशी संथ झाली असली तरी, #MeToo हॅशटॅगद्वारे या मोहिमेची बरीच चर्चा झाली. भारतातील अनेक राजकारणी, अभिनेते प्रसिद्ध व्यक्तिंना या मोहिमेच्या झळा बसल्या.
#WhistlePodu- आयपीएल क्रिकेट सामन्यादरम्यान हा हॅशटॅग उदयास आला. प्रामुख्याने सामना सुरु असताना चेन्नई सुपर किंग संघाशी निगडित ‘विसल पोडू’ म्हणजे शिट्टी वाजवून संघाला पाठिंबा देण्यातून हा हॅशटॅग तयार झाला.
#IPL2018- हा हॅशटॅग काय आहे याबाबत सांगण्यात अर्थ नाही. कारण, तो सर्वपरिचीत आहे. मात्र, #IPL2018 च्या माध्यमातून लोकांनी आयपीएल बाबत आपली मते खुलेपणाने व्यक्त केली.
हॅशटॅगमध्ये तेलुगू आघाडीवर
ट्विटरवर 2018मध्ये विविध हॅशटॅग आले. पण, या सर्वात अधिक बाजी तमिळ चित्रपट आणि तेलुगू भाषेशी संबंधीत हॅशटॅगने मारल्याचे दिसते. यात #Sarkar (‘सरकार’चित्रपटावर आधारीत हॅशटॅग), #Viswasam (२०१९ मध्ये प्रदर्शित होणाऱ्या ‘विश्वासम’चित्रपटासाठी), #BharatAneNenu(‘भारत आने नेणू’ या चित्रपटासाठी) , #AravindhaSametha (‘आराविंधा समेथा’ या चित्रपटा साठी), #Rangasthalam बाहुबलीनंतरचा बहुचर्चित चित्रपट 'रंगास्थालम'साठी, #Kaala (‘काला’ या तामिळ भाषेतील चित्रपटासाठी) हॅशटॅगचा समावेश आहे. (हेही वाचा, 2018 मध्ये Google वर सर्वाधिक शोधल्या गेलेल्या गोष्टी)
इतरही काही महत्त्वाचे हॅशटॅग
2018मध्ये #BigbossTelugu2 तेलुगू भाषेतील बिग बॉस या सुप्रसिद्ध असणाऱ्या सत्यमालिकेचा ट्विटर आणि सोशल मीडियावर चांगलाच बोलबाला दिसला. याशिवाय कठुआ येथील अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराविरुद्ध आवाज उठवण्यासाठी #JusticeForAsifa हा टॅग वापरण्यात आला. दरम्यान, कर्नाटकमध्ये अत्यंत चुरशीची झालेल्या विधानसभा निवडणुकीत KarnatakaElection हा हॅशटॅग वापरण्यात आला. आधार कार्डच्या वैधतेबाबत घडलेल्या घटना घडामोडींबाबत भाष्य करण्यासाठी #Aadhaar हा हॅशटॅग वापरण्यात आला. दरम्यान, दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंह यांच्या विवाहाबाबत माहिती दर्शविण्यासाठी #DeepVeer हा हॅशटॅगही भलाच चर्चिला गेला.