Viral Videos: मिरची खाणाऱ्या मुलीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
Girl Eating Chili Video | (Photo Credit- YouTube)

सोशल मीडियावर (Social Media) एक व्हिडिओ व्हायरल ( Viral Videos) झाला आहे. या व्हिडिओत एक मुलगी मिरची (Chili) खाताना दिसत आहे. दावा केला जात आहे की, केवळ पैशांच्या लालचेसाठी ही मुलगी मिरची खात (Girl Eating Chili ) आहे. व्हिडिओ पाहून सोशल मीडियावर अनेकांनी प्रतिक्रिया दिली आहे. अनेकांनी मिरची खायला देणाऱ्या व्यक्तीवर टीका केली आहे. काहींनी या मुलीची बाजू घेत तिचे कौतुकही केले आहे. आपणही हा व्हिडिओ पाहू शकता.

मिरची म्हटलं की डोळ्यासमोर नेहमीच तिखट जाळ आल्याची अनुभूती मिळते. कोणताही सर्वसामान्य माणूस एकही मिरची कोरडी खाऊ शकत नाही. अपवाद लोक असू शकतात. पण, जेव्हा एखादा व्यक्ती असे काही करताना दिसतो तेव्हा सहाजिकच आश्चर्य होते. त्यामुळे व्हिडिओतील या मुलीबाबतही असेच आश्चर्य व्यक्त केले जात आहे. (हेही वाचा, Viral Video: सापाशी मस्ती करणं तरूणाच्या आलं अंगलट, प्रायवेट पार्टलाच घेतला चावा, पहा व्हिडीओ)

दावा केला जात आहे की, ही मुलगी केवळ पैशाच्या अमिशाने मिरची खात आहे. दाव्यात जर खरोखरच तथ्य असेल तर पैशासाठी मोठ्या माणसाप्रमाणे लहान मुलेही नसते धाडस दाखवू शकते असे दिसते. तुमच्याही घरात लाहन मुले असतील तर आपण केवळ पैशांसाठी अशांप्रकारचे आमिष मुलांना कधीही दाखवू नका. यातून मुले पैशापोटी नको ते धाडस दाखवू लागतील. ज्यामुळे अनेक धोकेही निर्माण होऊ शकतात.