Spider Kills King Cobra: स्पायडरने केली चक्क किंग कोबराची शिकार; विषारी सापाचा असा केला खात्मा, येथे पाहा संपूर्ण व्हिडिओ

परंतु, कधी-कधी विषारी साप सुद्धा एखाद्या प्राण्यांच्या शिकार बनला आहे. दरम्यान, असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) प्रचंड व्हायरल होत आहे.

Spider Kills King Cobra (Photo Credit: Twitter)

साप (Snake) असा प्राणी आहे, जो मनुष्यांसह अनेक प्राण्यांचा काही क्षणातच जीव घेऊ शकतो. परंतु, कधी-कधी विषारी साप सुद्धा एखाद्या प्राण्यांच्या शिकार बनला आहे. दरम्यान, असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओत एका स्पायडरने (Spider) जगातील सर्वात विषारी सापांपैकी एक असलेल्या किंग कोबराची (King Cobra) शिकार केल्याची दिसत आहे. एका लहान स्पायडरसमोर किंग कोब्रा असहाय्य दिसला आहे. ट्विटरच्या एका वापरकर्त्यांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर सोशल मीडिया वापरकर्त्यांनी आश्चर्यही व्यक्त केले आहे.

नाझी अल तखीम नावाच्या ट्विटर वापरकर्त्यांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर करताना त्याने कॅप्शनमध्ये असे लिहले की, विशाल स्पायडर सापाचा शिकार करून त्याला खात आहे. कोबराची शिकार...चक्क किंग कोबराची शिकार. हा व्हिडिओ शुक्रवारी (29 जानेवारी) शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओत एक लहान कोळी किंग कोबराची शिकार करताना पाहून प्रत्येकजण हैराण होत आहे. हे देखील वाचा- Hunting & Hunter Viral Video: चिमणीने घेतला बदला, शिकारी स्वत:शिकार झाला; लोक म्हणाले जागेवर न्याय झाला, पाहा व्हिडिओ

व्हिडिओ-

 

या व्हिडिओत एक साप झुडपात बसलेला दिसत आहे. त्यावेळी त्याची नजर एका स्पायडरवर पडते. त्यानंतर स्पायडरची शिकार करण्यासाठी साप त्याचा पाठलाग करू लागला. परंतु, साप जवळ येताच स्पायडरने त्याच्यावर जोरदार प्रहार केला. ज्यामुळे साप तडफड करू लागला आणि अखेर त्याने आपला जीव सोडला.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif