मोठी शिकार केल्यानंतर स्वत: ला थंड करण्यासाठी एका विशाल अजगराने केली 'ही' कृती; Watch Video

पावसाळ्यात सापाच्या बिळामध्ये पाणी जात असते. त्यामुळे अनेक साप या दिवसात बिळाबाहेर पडतात. अशातचं सोशल मीडियावर एका अजगराचा (Python) व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये अजगर पोटभर शिकार केल्यानंतर ठंड पाण्याचा आनंद घेताना पाहायला मिळत आहे.

Python cools itself in water after a meal (PC - Twitter)

पावसाळ्यात सोशल मीडियावर अनेक विषारी सापाचे व्हिडिओ आणि फोटो व्हायरल होत असतात. पावसाळ्यात सापाच्या बिळामध्ये पाणी जात असते. त्यामुळे अनेक साप या दिवसात बिळाबाहेर पडतात. अशातचं सोशल मीडियावर एका अजगराचा (Python) व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये अजगर पोटभर शिकार केल्यानंतर ठंड पाण्याचा आनंद घेताना पाहायला मिळत आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्ये एक मोठा अजगर (Giant Python) पोटभर भोजन (Heavy Meal) करून एका छोट्या विहिरीत (Small Well) जाऊन स्वत: ला थंड करण्याचा प्रयत्न करत आहे. (हेही वाचा - बुलढाणा: बाटलीत पेट्रोल न दिल्याच्या रागात ग्राहकाने मालकाच्या केबिन मध्ये सोडले 3 जिवंत साप; मलकापूर रोड वरील घटना)

भारतीय वन सेवा अधिकारी (IFS) सुशांत नंदा (Susanta Nanda) यांनी आपल्या ट्विटर हँडलवरून हा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओला नंदा यांनी 'पोटभरून जेवण केल्यानंतर स्वत: ला ठंड करताना एक विशाल अजगर,' असं कॅप्शन दिलं आहे. हा व्हिडिओ पाहून यूजर्संनी मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. यातील काहींनी अजगराच्या मेन्यूबद्दल विचारणा केली आहे, तर काहींनी हे जेवण पचण्यासाठी किती वेळ लागेल? असा प्रश्न विचारला आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडिओ 1 मिनट 36 सेकंदाचा आहे. यात अजगराच्या पोटावर सूज दिसत आहे. परंतु, ही सूज नसून अजगराने मोठी शिकार केली आहे. शिकार केल्यानंतर अजगर पाणी पिण्यासाठी आणि स्वत: ला थंड करण्यासाठी विहिरीवर पोहचला आहे.