Ghost Story of Saffron BPO in Gurgaon: कब्रस्थान वर सुरू असलेल्या बीपीओ मध्ये काम करणार्‍या Rose ची गुढकथा

गुडगाव येथील सॅफ्रन बीपीओ (Saffron BPO) मधील रोझ (Rose) या मुलीची कहाणी सध्या अनेकांना आवाक करत आहे

प्रातिनिधिक प्रतिमा (Photo credit : pixabay)

तुम्ही आत्तापर्यंत अनेक भूतांच्या गोष्टी पाहिल्या असतील, वाचल्या असतील. वेब सिरीज आणि चित्रपटांमधून देखील तुम्ही भूतांच्या कथा अनुभवल्या असतील. पण आज आम्ही तुम्हांला दिल्लीच्या गुडगाव भागातील काही जणांनी घेतलेल्या खर्‍या खुर्‍या अनुभवाची गोष्ट सांगणार आहोत. गुडगाव येथील सॅफ्रन बीपीओ (Saffron BPO)  मधील रोझ (Rose) या मुलीची कहाणी सध्या अनेकांना आवाक करत आहे. अचानक रोझ कामावरून गायब झाल्याने तिच्या साथीदारांना धक्का बसला आहे. तुम्ही एका 'भूता' सोबत काम करत होतात ही गोष्ट तुम्हांला समजली तर काय होईल? याचा विचार जरा करून बघा. हा थट्टा किंवा मजा मस्तीचा विषय म्हणून नव्हे तर तुमच्या सोबत करणारी व्यक्ती ही अस्तित्त्वातच नसल्याची गोष्ट तुम्हांला समजली तर काय होईल? तुमच्याही मनात या 'रोझ' बद्दल जाणून घेण्याची इच्छा निर्माण झाली आहे? मग वाचा हा सारा प्रकार-

गुडगावच्या सॅफ्रॅन बीपीओ मध्ये काम करणारी रोझ ही एक कष्टाळू मुलगी होती. दर महिन्याला 'एम्पलॉयी ऑफ द मंथ' ची मानकरी ठरत होती. कामामध्ये तिची असलेली एकाग्रता, सातत्य हे इतर कर्मचार्‍यांसाठी प्रेरणादायी होतं. पण तिच्या यशाचं रहस्य होतं. एके दिवशी रोझी तासभरापेक्षा अधिक वेळ फोनवर बोलत होती. तिच्या फोन कॉलबद्दल टीम लिडरच्या मनात उत्सुकता होती. त्यांनी काही मदत हवी का? यासाठी पहायला गेल्यानंतर समोर फोनवर कुणीच नव्हतं. या घटनेनंतर रोझी गायब झाली.

अतिशय चोख काम करणारी रोझी अनेक दिवस ऑफिसला का येत नाही? याचा शोध ऑफिसकडून घेण्याचं काम सुरू झालं आणि त्यांच्यासमोर अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या. पहिल्यांदा त्यांनी घरमालकीणीकडे चौकशी केली. तेव्हा रोझी नावाची व्यक्तीच तिथे राहत नसल्याचं त्यांना समजलं. पुढे त्यांनी शेजारापाजार्‍यांना विचारलं. परंतू त्यांची निराशा झाली. पुढे त्यांनी रोझीच्या कुटुंबाला गाठलं. मात्र रोझी 8 वर्षांपूर्वीच या जगातून निघून गेल्याची माहिती त्यांना समजली आणि अनेकांच्या पायाखालची जमीन सरकली.

रोझी बाबत या गोष्टी ऑफिसमध्ये समजल्यानंतर अनेकांना धक्का बसला. दरम्यान गुडगावमध्ये हे सॅफ्रॅन बीपीओ एका दहनभूमीवर आहे. रोझीच्या बाबतची गोष्ट तिच्या जवळच्या मैत्रिणीला हृद्यविकाराचा धक्का बसला. ही बातमी समजताच अनेकांनी आपले राजीनामे पाठवले आहेत. दरम्यान ही गुडगाव मधील खूप वर्षांपूर्वी घडलेली एक सत्य घटना आहे. अनेकांना अजूनही फोन कुणाचा होता? रोझी दफनभूमीतून बाहेर आली होती का? असे अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत.