Ganpati Visarjan 2020: बाप्पाला निरोप देताना बालगणेशभक्ताला अश्रू अनावर (Watch Video)
यंदाचा गणेशोत्सव अत्यंत साधेपणाने करण्यात आला. यंदाच्या गणेशोत्सवावर कोरोना व्हायरस संकटाची गडद छाया होती. त्यामुळे यंदा दरवर्षीप्रमाणे मोठ्या थाटामाटात साजरा न होता अत्यंत साधेपणाने साजरा करण्यात आला.
'बाप्पा चालले... चालले हो गावाला.... चैन पडेना.. पडेना... आम्हाला..' असे म्हणत आपल्या अश्रूभऱ्या डोळ्यांनी गणपती बाप्पांना निरोप देताना अनेक भक्तांना आपण पाहिले असेल. हे सर्व भक्त वयाने मोठे असल्यामुळे त्याचे फारसे कौतुक नसते. पण जेव्हा एखादा बालगणेशभक्त (Bal Ganesh Devotee) गणपती बाप्पाला निरोप देतना डोळ्यात आश्रू आणतो तेव्हा अनेकांच्या मनात कुतूहलमिश्रीत कौतुकाच्या भावना उमटताना दिसतात. गणपती विसर्जन प्रसंगी (Ganpati Visarjan ) एका अशाच बालगणेशक्ताचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल (Ganpati Visarjan Viral Video) झाला आहे. जो आतापर्यंत अनेकांनी लाईक आणि शेअर केला आहे.
सोशल मीडियावरील व्हिडिओत दिसणारा चिमूकला गणेशभक्त नेमका कुठला आहे. त्याचे नाव, पत्ता याबाबत माहिती उपलब्ध होऊ शकली नाही. मात्र, गणपती बाप्पांना निरोप देताना तो ज्या पद्धतीने कष्टी झाला आहे. त्यावरुन त्याचा गणपती बाप्पासोबत लागलेला लळा दिसून येतो. HuchuAhmedabad नावाच्या @huchuahmedabad या ट्विटर हँडलवरुन हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. (हेही वाचा, Snake-Rats Playing Together on Lord Ganesh Idol Viral Video: गणपती बाप्पाच्या मूर्तीवर साप आणि उंदीर यांचा एकत्र वावर; पहा या दुर्मिळ नजाराच्या व्हायरल व्हिडीओ!)
ગણપતીના વિસર્જન ન કરવા માટે બાળક રડ્યું #viralvideo #Hca #GaneshChaturthi2020 #Ganeshutsav #Unlock3 #CoronavirusPandemic #ganpati #ganpatibappamorya #Homeganesha #Gannubappa #ecofriendly #Amdavad #Huchuahmedabad #vadodaradiaries #AHEMDABAD #ganeshdarshan pic.twitter.com/Gnzk4Rkldl
— HuchuAhmedabad (@huchuahmedabad) September 3, 2020
यंदाचा गणेशोत्सव अत्यंत साधेपणाने करण्यात आला. यंदाच्या गणेशोत्सवावर कोरोना व्हायरस संकटाची गडद छाया होती. त्यामुळे यंदा दरवर्षीप्रमाणे मोठ्या थाटामाटात साजरा न होता अत्यंत साधेपणाने साजरा करण्यात आला. कोरोना व्हायरस संसर्गाचा धोका टाळण्यासाठी राज्यातील धार्मिक स्थळंही बंत आहेत. ती सुरु करण्यात यावीत अशी मागणी मोठ्या प्रमाणावर होत आहे. अनेक राजकीय पक्ष, संस्था संघटना याबाबत आक्रमक आहेत. परंतू, राज्य सरकारने अद्याप तरी मंदिर, मशित, चर्च, गुरुद्वारा अथवा इतर कोणतेही धार्मिक स्थळ सुरु करण्याबाबत सुतोवाच केले नाही.
(The above story first appeared on LatestLY on Sep 03, 2020 06:36 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

