Funny Wedding Video: 'वावर हाय तर पावर हाय', एकदोन नव्हे 51 ट्रॅक्टर घेऊन नवरदेव पोहोचला मांडवात, सोशल मीडियावर व्हायरल व्हिडिओची चर्चा

लग्नात केल्या जाणाऱ्या हौस-मौजेला खरोखरच मोल नसते. अलिकडे तर त्यात इतके वैविध्य आले आहे की, सोशल मीडियाच्या माध्यमातून याची जोरदार चर्चा होते. लग्नाच्या वऱ्हाडाच्या व्हायरल (Funny Wedding Video) झालेल्या अशाच एका मजेदार व्हिडिओची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे.

Funny Wedding Video | (Photo Credit - Twitter/ANI)

लग्न म्हणजे अनेकांसाठी आनंदाचा आणि पर्वणीचा क्षण. लग्नात केल्या जाणाऱ्या हौस-मौजेला खरोखरच मोल नसते. अलिकडे तर त्यात इतके वैविध्य आले आहे की, सोशल मीडियाच्या माध्यमातून याची जोरदार चर्चा होते. लग्नाच्या वऱ्हाडाच्या व्हायरल (Funny Wedding Video) झालेल्या अशाच एका मजेदार व्हिडिओची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. राजस्थान राज्यातील बाडमेर जिल्ह्यातील सेवनियाला (Sewniyala) येथील नवरदेव आपले वऱ्हाड घेऊन बोरवा (Borwa) गावापर्यंत पोहोचला. त्याचा हा व्हिडिओ आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकांनी कौतुक केले आहे. तर काहींनी हे लग्नाचे वऱ्हाड आहे की, सैनिकांच्या वाहनाचा ताफा? असा सवाल केला आहे. त्याचे कारण म्हणजे नवरदे पठ्ठा लग्नाच्या वऱ्हाडासाठी साधेसुधे वाहन नव्हे तर चक्क 51 ट्रॅक्टर (Tractor) घेऊनच मंडपात पोहोचला.

लग्नाच्या वऱ्हाडासाठी चक्क 51 ट्रॅक्टर पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. या लग्नाच्या वऱ्हाडाची परिसरात जोरदार चर्चा आहे. व्हिडिओत आपण पाहू शकता की लष्करी ताफ्यातील वाहने जशी शिस्तीत एकापाठोपाठ एक जातात तशाच पद्धतीने हे ट्रॅक्टरसुद्धा एका रांगेत रस्त्याने हळूहळू आणि शिस्तीत जाताना दिसतात. हे दृष्ट पाहून असे वाटते की लष्कराची एक तुकडीच मोठ्या तयारीनिशी एखाद्या मोहीमेवर निघाली आहे. खरेतर सर्वसामान्यपणे असे दृष्ट पाहायला मिळत नाही. एखाद्या चित्रपटातच असे चित्र पाहायला मिळते. पण, या नवरदेव पठ्ठ्याने हे वास्तवात करुन दाखवले आहे. (हेही वाचा, ऐकावे ते नवलंच! 44 वर्षीय व्यक्तीने केले बकरीशी लग्न, समोर आले विचित्र कारण (Watch Video))

ट्विट

वृत्तसंस्था एएनआयने हा व्हिडिओ आपल्या ट्विटर हँडलवर शेअर केला आहे. हा व्हिडिओ राजस्थानमधील (Rajasthan) एका वरातीचा आहे. ज्यात नवरदेवाने 51 ट्रॅक्टरमधून 150 वऱ्हाडी नेले आहेत, असे दिसते. व्हिडिओत पाहायला मिळते की, नवरदेव स्वत: ट्रॅक्टर चालवत आहे. व्हिडिओ आतापर्यंत 23 हजारांहून अधिक युजर्सनी पाहिला आहे. लोक व्हिडिओ पाहून मजेशीर प्रतिक्रियाही नोंदवत आहेत.