Fitness YouTuber Stan Browney: युट्युबरचा जबरदस्त स्टंट, उडत्या हेलॉकॉप्टरला लटकून काढले Pull-Ups
एका पठ्ठ्याने तर चक्क असा स्टंट केला आहे. ज्याची सोशल मीडियावर प्रचंड चर्चा सुरु आहे. या महाभागाने चक्क हवेत उडत्या हेलीकॉप्टरला (Helicopter) लटकून पुलअप्स (Pull-Ups) काढले आहेत. या स्टंटचा एक विश्वविक्रम म्हणून नोंद घेण्यात आली आहे. हा स्टंट करतानाचा या युट्युबरचा व्हिडिओ गिनिर्ज वर्ल्डने (Guinness World Records) स्वत: शेअर केला आहे.
आपले शरीर केवळ तंदुरुस्तच (Fitness ) नव्हे तर बलदंड दिसावे यासाठी लोक नाना तऱ्हेचे प्रयत्न करतात. व्यायाम करतात सातत्याने व्यायामशाळा, तालीम यात जाऊन कसरत करतात. सर्वसामान्यपणे लोकांना व्यायामशाळेत जाऊनच व्यायाम करायला आवडते. पण काही महाभाग असे असतात ते व्यायाम करतानाही स्टंट शोधतात. एका पठ्ठ्याने तर चक्क असा स्टंट केला आहे. ज्याची सोशल मीडियावर प्रचंड चर्चा सुरु आहे. या महाभागाने चक्क हवेत उडत्या हेलीकॉप्टरला (Helicopter) लटकून पुलअप्स (Pull-Ups) काढले आहेत. या स्टंटचा एक विश्वविक्रम म्हणून नोंद घेण्यात आली आहे. हा स्टंट करतानाचा या युट्युबरचा व्हिडिओ गिनिर्ज वर्ल्डने (Guinness World Records) स्वत: शेअर केला आहे.
व्हायरल झालेल्या या व्हिडिओत पाहायला मिळत आहे की, दोन तरुण हेलीकॉप्टर हवेत उडत असलेल्या हेलिकॉप्टरला लटकून पुलअप्स काढत आहेत. या थरारक प्रसंगाचा व्हिडिओ गिनीज वर्ल्ड रिकॉर्डने शेअर केला आहे. दरम्यन, अर्जेन अल्बर्स आणि स्टेन ब्राऊनी नावाच्या दोन यूट्युबरनेने बेल्जियमच्या एंटरपर्व मध्ये होवेनन एयरफील्डमध्ये पुल-अप्स करण्याचे या आधीचे सर्व विक्रम मोडीत काढले आहेत. व्हायरल व्हिडिओत आपण पाहू शकता की, कशापद्धतीने फिटनेस एन्फ्ल्युएन्सरने हेलीकॉप्टरला लटकून 25 पुल-अप्स (25 pull-ups) काढले. ज्याचे पुढे गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड बनले. (हेही वाचा, World Record बनविण्यासाठी हवेतील Helicopter ला लटकत तरुणाकडून Pull-Ups; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल)
व्हिडिओमध्ये पाहायला मिळते की, सगळ्यात पहिल्यांदा एल्बर्स येतो आणि होवरंग हेलिकॉप्टरच्या माध्यमातून 24 पुल अप्स काढतो. तर स्टेन (Stan Browney) हा एका मिनीटात 25 पुल-अप करतो. दोघांनीही पहिल्यांदा अर्मेनियाई सीरियल्स रिकॉर्ड ब्रेकर रोमन सहराडियन चे रोकॉर्ड तोडले. ज्याच्या नावावर 23 पुलअप नोंदविण्यात आले होते.
व्हिडिओ
गिनीज वर्ल्ड रिकॉर्डने आपल्या यूट्यूब हँडलवर (YouTube Channel) या विक्रमावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात म्हटले आहे की, ब्राऊनीच्या या तरुणाने हे पाहण्यासाठी एक स्पर्धा करत एका मिनीटाटत हेलीकॉप्टरमधून सर्वाधिक पुलअप कोण काढते आहे. जागतिक विक्रमाची बरोबरी करुन तो कोण मोडीत काढेन. गिनीज वर्ल्ड रिकॉर्ड (Guinness World Record) ने म्हटले आहे की, आपल्या जीवनाच्या सर्वात प्रदीर्घ काळात स्टेन आणि अर्जेन यांनी आपली क्षमता सर्वाधिक सिद्ध केल्या. आपल्या सर्वोच्च प्रतिभेचा साक्षात्कार दिला. जेणेकरुन जुना जाकतिक विक्रम (World Record) मोडला गेला.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)