केरळ च्या Transgender Couple च्या आयुष्यात पुढल्या महिन्यात येणार बाळ; ‘First Pregnant Transman’चं फोटो शूट वायरल
जिया पावलच्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये दोघेही फोटोशूटसाठी पोज देताना दिसत आहेत.
भारतामध्ये पहिल्यांदाच एका ट्रांस कपलने प्रेगनंसीची घोषणा केली आहे. केरळ (Kerala) मधील कोझिकोड चं ट्रांस कपलच्या आयुष्यात बाळ होणार आहे. त्यांनी खास फोटोशूट करून ही गोड बातमी शेअर केली आहे. मार्च महिन्यात त्यांच्या आयुष्यात बाळ येणार आहे. इंस्टाग्राम वर त्यांनी पोस्ट केली आहे. 'जिया' एक पुरूष म्हणून जन्माला आलेला आहे. त्यानंतर त्याने महिलेमध्ये स्वतःला परावर्तित केले आहे. जाहद एक महिला म्हणून जन्माला आली आहे. त्यानंतर पुरूष म्हणून स्वतःला ट्रान्सफॉर्म केले आहे. मागील 3 वर्षांपासून ते एकत्र राहत आहेत.
जिया पावलच्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये दोघेही फोटोशूटसाठी पोज देताना दिसत आहेत. जरी मी जन्माने किंवा माझ्या शरीराने स्त्री बनले नाही, पण मी मोठी झाल्यावर मला माझे स्त्रीत्व कळले, परंतु मला आई व्हायचे आहे हे एक स्वप्न आहे. असे पोस्ट केले आहे.
पहा पोस्ट
“काळाने आम्हाला एकत्र आणून तीन वर्षे झाली आहेत. माझ्या आईच्या स्वप्नाप्रमाणेच तिच्या वडिलांचे स्वप्न आणि आमची एक इच्छा यांनी आम्हाला एका विचारात एकत्र आणले. आज 8 महिन्यांचे आयुष्य त्याच्या पोटात पूर्ण संमतीने वाढतत आहे... त्याच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी घेतलेल्या निर्णयांना पाठिंबा देत आहे. आमच्या माहितीनुसार, ही भारतातील पहिली ट्रान्स मॅन गर्भधारणा आहे असे जिया सांगते. दरम्यान जियाने तिच्या कुटुंबातील सदस्यांचे तसेच डॉक्टरांचे आभार मानले ज्यांनी गर्भधारणेदरम्यान जोडप्याला पाठिंबा दिला आणि मार्गदर्शन केले.