First Legal Sex Toy Store: गोव्यातील Calangute मध्ये सुरु झाले देशातील पहिले सरकारमान्य 'सेक्स टॉय'चे दुकान; जाणून घ्या कोणत्या प्रॉडक्ट्सना आहे मागणी (See Photos)
परदेशात अशी दुकाने बहुधा अरुंद रस्ते किंवा तळघरात असतात. आम्ही हे मेडिकल स्टोअरप्रमाणे बांधले आहे. आम्ही दुकानास मान्यता देणारी सर्व प्रमाणपत्रे भिंतीवर लावली आहेत
भारतात लैंगिक संबंधांबद्दल (Sex) उघडपणे बोलणे ही जणू काही ‘सामाजिक बंदी’ असलेली गोष्ट समजली जाते. लोकही सेक्सबद्दल मनमोकळेपणाने बोलण्यास टाळाटाळ करतात. त्यात ‘सेक्स टॉय’बद्दल (Sex Toy) तर अजूनच संकोच आहे. ‘सेक्स टॉय’ ही गोष्ट पाश्चात्य देशांमध्ये अधिक प्रचलित आहे, परंतु आता बदलत्या काळामध्ये समाजाची विचारसरणी बदलत आहे. भारतामध्येही सेक्स टॉयचा वापर वाढला आहे. महत्वाचे म्हणजे आता भारतामधील पहिले अधिकृत ‘सेक्स टॉय’चे दुकान गोव्यात (Goa) सुरु झाले आहे. कामा गिझमोस (Kama Gizmos) हे गोव्याच्या कलंगुटमध्ये (Calangute) सेक्स टॉय आणि वेलनेस प्रॉडक्ट्सची विक्री करणारे भारतातील पहिले मान्यताप्राप्त दुकान आहे.
Vice.com च्या अहवालानुसार गोव्याच्या कलंगुटमधील या दुकानात सेक्स टॉय, कंडोम, स्प्रे, जेल, व्हायब्रेटर्स, पॅकर्स अशी विविध उत्पादने विकली जात आहेत. विशेष म्हणजे हे दुकान एखाद्या अंधाऱ्या ठिकाणी किंवा तळघरात नाही तर मोकळ्या रस्त्यावर आहे आणि ते मेडिकल स्टोअरसारखे दिसत आहे. दुकानात कोणत्याही प्रकारची नग्नता आणि अश्लीलतेची जाहिरात केली गेली नाही. दुकानात सर्वाधिक बीडीएसएम सेट्स, मार्शमॅलो फ्लेव्हर्ड, ग्लो इन द डार्क व्हेगन कंडोम, कॉक रिंग्ज, व्हायब्रेटर्स आणि रोल प्ले कॉस्ट्यूम्स विकले जात आहेत.
दुकानाच्या डिझाइनबाबत दुकानाचे सह-संस्थापक नीरव मेहता म्हणाले की, ‘आम्ही जाणीवपूर्वक ते अंधाऱ्या ठिकाणी किंवा तळघरात बांधले नाही. परदेशात अशी दुकाने बहुधा अरुंद रस्ते किंवा तळघरात असतात. आम्ही हे मेडिकल स्टोअरप्रमाणे बांधले आहे. आम्ही दुकानास मान्यता देणारी सर्व प्रमाणपत्रे भिंतीवर लावली आहेत, कोणत्याही प्रकारचा राजकीय वाद उद्भवू नये म्हणून हे केले गेले आहे.’ (हेही वाचा: प्रेयसी बरोबर शॉपिंग करताना रंगेहात पकडला गेला नवरा; पत्नीने भर रस्त्यात दोघांनाही दिला चोप (Watch Video)
अश्लीलतेविरूद्ध भारतात कठोर कायदे आहेत व ही गोष्ट लक्षात घेता देशात सेक्स टॉयचा व्यवसाय करणे अशक्य आहे. अहवालानुसार मेहता म्हणाले, ‘भारतात अशा दुकानांविषयी स्पष्ट कायदा नाही परंतु आपण अश्लील नसणाऱ्या सेक्स प्रॉडक्ट्सची विक्री करू शकता. यामध्ये आम्ही जाणीवपूर्वक सेक्स खेळणी आणि अशी उत्पादने निवडली ज्यांच्या पॅकेजिंगमधून अश्लीलता प्रतिबिंबित होणार नाही. त्यामुळे अश्लीलतेच्या कायद्याचे उल्लंघन झाले नाही.’