Rajasthan Shocker: अलवरमधील हॉटेलमध्ये अज्ञात हल्लेखोरांकडून गोळीबार; खंडणी म्हणून केली 50 लाख रुपयांची मागणी, Watch Video

यावेळी हल्लेखोरांनी हवेत गोळीबार करत 50 लाख रुपये खंडणी देण्याची मागणी केली आणि घटनास्थळावरून पळ काढला.

Firing by unknown assailants at hotel in Alwar (PC - Twitter)

Rajasthan Shocker: राजस्थानमधील अलवरमधील एका रेस्टॉरंटमध्ये काही हल्लेखोरांनी गोळीबार (Firing) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल (Viral Video) होत आहे. यात दोन बंदूकधारी चेहरा झाकून एका हॉटेलमध्ये येतात आणि हॉटेलच्या प्रवेशद्वारावर हवेत गोळीबार करत असल्याचं दिसत आहे. हल्लेखोरांनी गोळीबार सुरू केल्याने हॉटेलमध्ये उपस्थित लोक जीव वाचवण्यासाठी धावू लागले. यावेळी हल्लेखोरांनी हवेत गोळीबार करत 50 लाख रुपये खंडणी देण्याची मागणी केली आणि घटनास्थळावरून पळ काढला.

या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून दोन तरुण अलवर सदर पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या टेल्को चौरस्त्यावर असलेल्या एका हॉटेलमध्ये आल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. हल्लेखोर हॉटेलमध्ये पोहोचले आणि त्यांनी गोळीबार केला, त्यांनी हॉटेलच्या प्रवेशद्वारावर सुमारे पाच राऊंड गोळ्या झाडल्या. हॉटेल मालकाच्या मनात भीती निर्माण करण्यासाठी हा गोळीबार करण्यात आल्याचं म्हटलं जात आहे. या हल्लेखोरांनी हॉटेल मालकाला मोठी रक्कम देण्याची मागणी केली. (हेही वाचा - Prisoners Burn Effigy Of Ravana In Jail: कैद्यांनी कारागृहात जाळला रावणाचा पुतळा; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर 4 अधिकारी निलंबित)

दरम्यान, पोलिसांनी या घटनेची दखल घेत तक्रार नोंदवून या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. अलवरमधील हॉटेलबाहेर गोळीबार करणाऱ्या हल्लेखोरांना पकडण्यासाठी पोलिसांनी एक टीम तैनात केली आहे. पुढील महिन्यात राज्यात निवडणुका होत आहेत. राजस्थानमध्ये 25 नोव्हेंबरला विधानसभेच्या निवडणुका होणार असून, 3 डिसेंबरला निकाल जाहीर होणार आहेत. घटनेचा व्हिडिओ समोर आल्यानंतर भारतीय जनता पक्षाने (भाजप) काँग्रेसच्या नेतृत्वाखालील अशोक गेहलोत सरकारवर जोरदार टीका केल्याने या घटनेला राजकीय वळण लागले आहे.