Sara Ali Khan हिच्या 'आंख मारे' गाण्यावर डान्सचा विदेशी तडका (VIDEO )
रिलायन्स एंटरटेन्मेंटने हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर करताना रिलायन्स एंटरटेन्मेंटने लिहिले आहे, 'देसी गाने पर विदेशी तड़का.'
रणवीर सिंह (Ranveer Singh)आणि सारा अली खान (Sara Ali Khan)यांचा चित्रपट सिम्बा (Simmba) लवकरच प्रदर्शीत होत आहे. दरम्यान, या चित्रपटातील 'आंख मारे' (Aankh Marey)या गाण्याने युवकांच्या हृदयात स्थान मिळवले आहे. टीव्ही, एफएम रेडीओ आणि तरुणाईच्या मोबाईलमध्ये हेच गाणे वाजताना दिसत आहे. सोशल मीडियावरही अनेक व्हिडिओ व्हायरल झाले असून, त्यात अनेक मंडळी सारा अली खान (Sara Ali Khan)हिच्याप्रमाणे डान्स स्टेप करताना पाहायला मिळत आहे. दरम्यान, हे गाणे केवळ भारतच नव्हे तर, न्यू यॉर्क मध्येही प्रसिद्ध झाले आहे. न्यू यॉर्कच्या टाईम्स स्वायर इथल्या लोकांना हे गाणे भलतेच आवडले. त्यामुळे त्यांनी या गाण्यावर थेट डान्स केला. सध्या या गाण्यावरील हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे.
टाइम्स स्वायर येथे एक फ्लॅश मॉब झाला. यात लोकांनी आंख मारे या गाण्यावर डान्स केला. अमेरिकेतही बॉलिवूड चित्रपटांची जोरदा क्रेझ आहे. तुम्ही व्हिडिओत पाहू शकता की, टाइम्स स्वायर समोर लोक कशा प्रकारे येतात आणि गाण्यावर डान्स करतात. सध्या सोशल मीडियावर हा व्हिडिओ तुफान व्हायरल झाला आहे. रिलायन्स एंटरटेन्मेंटने हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर करताना रिलायन्स एंटरटेन्मेंटने लिहिले आहे, 'देसी गाने पर विदेशी तड़का.' (हेही वाचा, 'Aankh Marey' गाण्यावरील 'या' दोन मुलींचा डान्स सोशल मीडियावर व्हायरल, YouTube वर 8 लाखाहून अधिक व्ह्युज)
हे गाणे नेहा कक्कड आणि मीका सिंगने हे गाणे गायले आहे. 2018मध्ये आलेले हे गाणे तुफान लोकप्रिय झाले आहे. करण जोहर याच्या धर्मा प्रोडॉक्शन आणि रोहित शेट्टीच्या प्रोडॉक्शन हाऊसच्या बँनरखाली हा चित्रपट बनला आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनाबाबत सर्वांनाच उत्सुकता आहे. 2018मधली रणविर सिंग याचा हा दुसरा चित्रपट आहे. साऊथ इंडियन चित्रपट 'टेंपर'चा हा रिमेक आहे. सैफ अली खान आणि अमृता सिंह यांची कन्या सारा अली खान हिचा बॉलिवूडमधील हा दुसरा चित्रपट आहे.