Mukesh Ambani यांना झाला Pancreatic Cancer? सोशल मिडियावर व्हायरल झालेल्या बातमीमागचे काय आहे सत्य, Fact Check
असे सांगितले जात आहे की रिलायन्स इंडस्ट्रीचे (Reliance Industries)चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांना अग्नाशय कॅन्सर (Pancreatic cancer) झाला आहे.
कोरोना व्हायरस (Coronavirus) आणि त्यासोबतच आलेले लॉकडाऊन (Lockdown) या दरम्यान सोशल मिडियावर अनेक खोट्या बातम्यांना उधाण आले आहे. कला, क्रिडा क्षेत्रासह अन्य क्षेत्रातील दिग्गजांबाबत सोशल मिडियावर खोट्या बातम्या वा-याच्या वेगाने पसरत आहेत. त्यात आता भारतातील श्रीमंताच्या यादीत असलेले मुकेश अंबानी यांच्या बाबतीत एक बातमी सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. असे सांगितले जात आहे की रिलायन्स इंडस्ट्रीचे (Reliance Industries)चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांना अग्नाशय कॅन्सर (Pancreatic cancer) झाला आहे.
Fact Check:
लेटेस्टलीच्या टीमने जेव्हा या बातमी मागचे सत्य पडताळून पाहिले तेव्हा मुकेश अंबानी यांना कुठलाही कॅन्सर झाला नसल्याचे समोर आले आहे. ही एक खोटी बातमी आहे. लेटेस्टली याबाबतची रिलायन्स जिओच्या कॉर्पोरेट कम्युनिकेशन टीमसोबत बातचीत करुन ही बातमी खोटी असल्याचे सांगितले आहे. हेदेखील वाचा- Fact Check: येत्या 30 नोव्हेंबर पर्यंत बंद राहणार शाळा? PIB ने केला व्हायरल बातमीचा खुलासा
सोशल मिडियावर व्हायरल झालेल्या या बाबतीत मुकेश अंबानी यांना पेनक्रियाज कॅन्सर झाला असून त्यांची स्लोन केटरिंग न्यूयॉर्कमध्ये सर्जरी झाली आहे. असे सांगण्यात येत आहे. त्याचबरोबर लंडनमध्ये त्या यकृताचे प्रत्यारोपण सुद्धा केले आहे असे सांगितले जात आहे. तसेच त्यांचे 30 किलो वजन घटले आहे असे ही सांगितले जात आहे.
कोरोना व्हायरस महामारी दरम्यान अशा प्रकारच्या अनेक खोट्या बातम्या झपाट्याने व्हायरल होत आहे. त्यामुळे सोशल मिडियावरील या बातम्यांवर विश्वास ठेवू नका असे आवाहन प्रशासनाकडून आणि पोलिसांकडून करण्यात येत आहे. त्याचबरोबर अफवा पसरवण्यापासून ही सावध रहा. हा एक प्रकारचा सायबर गुन्हा असे सांगण्यात येत आहे.