IPL Auction 2025 Live

Fact Check: पुढील 20 तास भारतासाठी कठीण असल्याची WHO कडून चेतावनी? जाणून घ्या व्हायरल मेसेज मागील सत्य

यात कोरोनाग्रस्तांची संख्या वेगाने वाढत असून मृतांच्या आकड्यातही वाढ पाहायला मिळत आहे. यादरम्यान फेक न्यूज आणि चुकीच्या बातम्या देखील झपाट्याने पसरत आहेत.

Fact Check (Photo Credits: Twitter)

भारतातील कोरोना व्हायरसची दुसरी लाट (Coronavirus Second Wave) दिवसेंदिवस दाहक रुप धारण करत आहे. यात कोरोनाग्रस्तांची संख्या वेगाने वाढत असून मृतांच्या आकड्यातही वाढ पाहायला मिळत आहे. यादरम्यान फेक न्यूज (Fake News) आणि चुकीच्या बातम्या देखील झपाट्याने पसरत आहेत. खोट्या बातम्यांच्या या यादीत आता अजून एका बातमीचा समावेश झाला आहे. कोविड-19 (Covid-19) रुग्णवाढीच्या पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटनेने भारताला चेतावनी दिली असल्याचा दावा या मेसेजमध्ये करण्यात आला आहे. यात पुढील 20 तास भारतासाठी कठीण असल्याचे म्हटले आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या मेसेजमध्ये म्हटले की, डब्ल्यूएचओ आईसीएमआर ने भारताला चेतावनी दिली आहे. पुढील 20 तास भारतासाठी अत्यंत कठीण आहेत. या 20 तासांत भारतातील परिस्थिती न सुधारल्यास भारत उद्या रात्री 11 वाजल्यापासून थर्ड स्टेप म्हणजेच कम्युनिटी ट्रान्समिशनमध्ये प्रवेश करेल आणि असे झाल्यास भारतात 10 मे पर्यंत सुमारे 50 हजार लोकांचा मृत्यू होईल. कारण इतर देशांच्या तुलनेत भारताची लोकसंख्या खूप अधिक आहे. तरी देखील भारताला याचे गांभीर्य समजलेले नाही. भारतात कोरोना संक्रमण दुसऱ्या स्टेजमध्ये राहील, अशी देवाकडे प्रार्थना करा.

PBNS Tweet:

(Fact Check: तुरटीच्या पाण्याने कोरोनापासून बचाव होऊ शकतो या सल्ल्याचा व्हिडीओ वायरल; PIB ने फेटाळला दावा)

या मेसेजमागील सत्य तपासले असता हा मेसेज फेक आणि निराधार असल्याचे समोर आले आहे. पीएनबीएस म्हणजेच प्रसार भारती न्यूज सर्व्हिस ने एक ट्विट शेअर केले आहे. यात या मेसेजमागील सत्याचा उलघडा केला आहे. हा मेसेज खोटा असून कोविड-19 रुग्णवाढीच्या पार्श्वभूमीवर अशा प्रकारचा कोणताही मेसेज WHO कडून भारताला देण्यात आलेला नाही. यावर @WHOSEARO कडून देखील स्पष्टीकरण देण्यात आले असून WHO कडून अशी कोणत्याही प्रकारची चेतावनी भारताला देण्यात आलेली नसल्याचे म्हटले आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या कोणत्याही मेसेजवर विश्वास ठेऊ नका आणि फॉरवर्ड करु नका.