Fact Check: कोविड-19 लस घेतल्यानंतर सेनेचे काही जवान बेशुद्ध पडल्याचा व्हिडिओ व्हायरल; PIB ने सांगितले सत्य

असाच एक व्हिडिओ सध्या वेगाने व्हायरल होत आहे. त्यात सेनेचे काही जवान बेशुद्ध पडल्याचे दिसत आहे.

Fake News | (Photo Credits: Twitter)

आजकाल सोशल मीडियावर कोणतीही गोष्ट व्हायरल व्हायला वेळ लागत नाही. असाच एक व्हिडिओ सध्या वेगाने व्हायरल (Viral) होत आहे. त्यात सेनेचे काही जवान बेशुद्ध पडल्याचे दिसत आहे. कोविड-19 लस (Covid-19 Vaccine) घेतल्यामुळे हे जवान बेशुद्ध पडल्याचा दावा हा व्हिडिओतून करण्यात आला आहे. या व्हिडिओसोबत असलेल्या मेसेजमध्ये लिहिले आहे की, "देशाच्या जवानांनी कोविड-19 लस घेतली आणि जेव्हा ते धावत होते तेव्हा त्यातील काहीजण बेशुद्ध पडले. तर काहींना हृदयविकाराचा झटका आला आणि काहीजणांनी आपला जीवही गमावला. यावर मीडियाने मौन धारण केले आहे. आता तुम्हीच सांगा लस घेणे योग्य आहे की अयोग्य?" (Fact Check: Pfizer's COVID-19 Vaccine घेतल्यावर ऑस्ट्रेलियातील दो मुलांचा मृत्यू? पाहा व्हायरल व्हिडिओमागील सत्य)

वेगाने व्हायरल होणाऱ्या या मेसेजमुळे लसीसंदर्भात लोकांच्या मनात शंका निर्माण होते. त्यामुळे पीआयबीने या व्हिडिओ मागील सत्याचा खुलासा केला आहे. पीआयबीने आपल्या ट्विटमध्ये म्हटले की, "या व्हिडिओचा कोविड-19 लसीशी काही संबंध नाही. ट्रेनिंग दरम्यान प्रचंड उन्हामुळे जवान बेशुद्ध झाले होते."

Fact Check By PIB:

दरम्यान, यापूर्वी अनेकदा कोविड-19 लसीबद्दल गैरसमज पसरवणाऱ्या बातम्या समोर आल्या होत्या. यामुळे नागरिकांना लसीकरणापासून परावृत्त केले जात होते. मात्र लसीसंदर्भात जनजागृती करुन नागरिकांना लस घेण्यास प्रोत्साहित करण्याचे काम सरकार सातत्याने करत आहे. कोविड-19 चे संकट अद्याप संपलेले नाही. त्यामुळे लस घेऊन आपल्यासह इतरांना सुरक्षित करणे अत्यंत गरजेचे आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif